बांगलादेशसाठी पाकिस्तानची मोठी खेळी! पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची टी-२० विश्वचषकात भारताविरुद्ध न खेळण्याची घोषणा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ
पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ

 

बांगलादेशचा पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही. आमचा हा निर्णय योग्यच आहे, असे पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सांगितले; परंतु या स्पर्धेत उपांत्य किंवा अंतिम फेरीत भारत प्रतिस्पर्धी असेल तर काय करणार, यावर भाष्य केले नाही यावरून त्यांची भूमिका सोईस्कर असल्याची चर्चा केली जात आहे.

खेळात राजकारण नको यावरून आम्ही भारताविरुद्धचा सामना न खेळण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे, असे शरीफ यांनी एका व्हिडिओद्वारे आज जाहीर केले. आम्ही बांगलादेशच्या पाठीशी उभे आहोत आणि आमचा हा निर्णय योग्य आहे, असे ते पुढे म्हणाले. शरीफ यांचा हा व्हिडिओ जाहीर होतात बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नझरुल यांनी 'धन्यवाद पाकिस्तान' असे सोशल मीडियावरून म्हटले आहे.

भारताविरुद्ध १५ फेब्रुवारीला नियोजित असलेली लढत टाळली तर पाकिस्तान क्रिकेटला मोठ्या आर्थिक दंडाचा सामना करावा लागेल, तसेच आयसीसीकडून मिळणाऱ्या आर्थिक हिस्साही त्यांना गमावावा लागेल, असे सांगण्यात येत असतानाही पाक पंतप्रधान जाहीरपणे अडचणी निर्माण करीत आहेत.