पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोचा सर्वाधिक सामन्यांचा विक्रम

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय लढतींमध्ये भाग घेणारा खेळाडू ख्रिस्तियानो
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय लढतींमध्ये भाग घेणारा खेळाडू ख्रिस्तियानो

 

लिस्बन : पोर्तुगालच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो आता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय लढती खेळणारा खेळाडू ठरला आहे. जर्मनीमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या युएफा युरो स्पर्धेचा पात्रता सामना खेळल्यानंतर आता तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय लढतींमध्ये भाग घेणारा खेळाडू ठरला आहे.

लिस्बनमध्ये झालेल्या लाईश्टेस्टाईनविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या कारकिर्दीतील १९७ वी लढत खेळली. कुवेतच्या बादर अल-मुतावाचा १९६ आंतरराष्ट्रीय लढतींचा विक्रम त्याने मोडीत काढला आहे. रोनाल्डोने २००३ मध्ये पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघाकडून पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत २० वर्षांच्या कारकिर्दीत १९७ सामन्यांत १२० गोल केले आहेत.

लाईश्टेस्टाईनविरुद्धचा सामना पोर्तुगालने ४-० असा जिंकला. या लढतीत रोनाल्डोने ५१ व्या मिनिटाला पेनल्टीवर आणि ६३ व्या मिनिटाला मैदानी गोल केला. पोर्तुगालतर्फे इतर दोन गोल जोआओ कॅन्सेलो आणि बर्नार्डो सिल्वा यांनी अनुक्रमे आठव्या व ४७ व्या मिनिटाला केले.