T20 World Cup : सुपर ८मध्ये भारतासमोर या संघांचे आव्हान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 Months ago
टीम इंडिया
टीम इंडिया

 

क्रिकेटच्या महाकुंभ टी-२० वर्ल्ड कप २०२४ मधील सुपर-८ फेरीसाठी सर्व८ संघ निश्चित करण्यात आले आहेत. १ जूनपासून सुरू झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये चाहत्यांना अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. जिथे पाकिस्तान आणि न्यूझीलंडसारखे मोठे संघ सुपर-८ मध्ये स्थान मिळवू शकले नाहीत. तर अमेरिका आणि अफगाणिस्तानचे संघ आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरले. या संघांनी चांगली कामगिरी करत सुपर-८ मध्ये स्थान निश्चित केले.

आतापर्यंत भारत, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचे संघ सुपर-८ साठी पात्र ठरले आहेत. सुपर-८ मध्ये संघांची प्रत्येकी चारच्या दोन गटात विभागणी केली जाईल. प्रत्येक संघ सुपर-८ फेरीत तीन सामने खेळणार आहे. सुपर-८ मधील प्रत्येक गटातील टॉप-२ मध्ये स्थान मिळवणारे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

या १२ संघांचा प्रवास संपला
दुसरीकडे यावेळी वर्ल्ड कपमध्ये २० संघ सहभागी झाले होते. आता १२ संघांचा प्रवास संपला आहे. ज्यामध्ये दोन मोठ्या संघांचाही समावेश आहे. ज्यामध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, नामिबिया, आयर्लंड, कॅनडा, ओमान, स्कॉटलंड, श्रीलंका, युगांडा, नेपाळ आणि नेदरलँड यांचा समावेश आहे.

गट-१ : भारत, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया

गट-२ : अमेरिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका

भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानशी
भारतीय संघ सुपर-८ च्या गट-१ मध्ये आहे. येथे टीम इंडिया बांगलादेश, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने खेळणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना २० जूनला अफगाणिस्तानविरुद्ध, २२ जूनला बांगलादेशविरुद्ध आणि २२ जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अफगाणिस्तान आणि बांगलादेशला अजिबात हलक्यात घेण्याचा प्रयत्न करणार नाही. अफगाणिस्तानने ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंडसारख्या मोठ्या संघाचा पराभव केला होता.

सुपर-८ मधील भारतीय संघाचे वेळापत्रक -
अफगाणिस्तान विरुद्ध भारत –२० जून, बार्बाडोस
भारत विरुद्ध बांगलादेश- २२ जून, अँटिग्वा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - २४ जून, सेंट लुसिया
टी-२० वर्ल्ड कप २०२४मधील सुपर ८सामन्यांचे वेळापत्रक
१९ जून - यूएसए विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अँटिग्वा, रात्री ८ वा
२० जून - इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंट लुसिया, सकाळी ६ वा
२० जून - अफगाणिस्तान विरुद्ध भारत, बार्बाडोस, रात्री ८ वा
२१ जून - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, अँटिग्वा, सकाळी ६ वा
२१ जून - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंट लुसिया, रात्री ८ वा
२२जून - यूएसए विरुद्ध वेस्ट इंडीज, बार्बाडोस, सकाळी ६वाजता
२२ जून- भारत विरुद्ध बांगलादेश, अँटिग्वा, रात्री ८ वा
२३ जून - अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सेंट व्हिन्सेंट, सकाळी ६ वाजता
२३ जून - यूएसए विरुद्ध इंग्लंड, बार्बाडोस, रात्री ८ वा
२४ जून - वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अँटिग्वा, सकाळी ६ वा
२४ जून - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, सेंट लुसिया, रात्री ८ वा
२५ जून - अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, सेंट व्हिन्सेंट, सकाळी ६ वाजता
२७ जून - उपांत्य फेरी १ , गयाना, सकाळी ६ वाजता
२८ जून - उपांत्य फेरी २ , त्रिनिदाद, रात्री ८ 
२९ जून - फायनल, बार्बाडोस, रात्री ८ वा