इस्रायलच्या निषेधार्थ तुर्की खेळाडूने केले 'हे' धाडसी कृत्य

Story by  Saurabh Chandanshive | Published by  Saurabh Chandanshive • 15 d ago
तुर्कीचा प्रसिद्ध कुंग फू फायटर एर्बाकन अक्युज
तुर्कीचा प्रसिद्ध कुंग फू फायटर एर्बाकन अक्युज

 

युरोपीय चॅम्पियन आणि तुर्कीचा प्रसिद्ध कुंग फू फायटर एर्बाकन अक्युज याने एक कठोर पाऊल उचलले आहे. त्याने इस्रायलच्या आक्रमकतेचा निषेध करण्यासाठी आणि पॅलेस्टाईनबरोबर एकजुटी दाखवण्यासाठी आपले सुवर्णपदक नील नदीत फेकले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

कुंग फू चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेले सुवर्णपदक 

एर्बाकन याने २०२५ च्या युरोपीय कुंग फू चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तो जागतिक चॅम्पियन बनला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत हा तरुण खेळाडू काहिराच्या नील नदीकाठी उभा आहे. तो आपले पदक नदीत फेकताना दिसत आहे. त्यामध्ये तो म्हणताना दिसत आहे की, “मला मिळालेले सर्व पुरस्कार  पॅलेस्टाईनी पीडितांच्या रक्ताच्या एका थेंबापेक्षा मौल्यवान नाहीत. स्वतंत्र  पॅलेस्टाईन स्थापन झाल्यावर मी पुन्हा याच ठिकाणी येईन.” एर्बाकन याच्या या निषेधाने जगाचे लक्ष वेधले आहे.

व्हिडिओ झपाट्याने व्हायरल
त्याचा हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. डिसेंबर २०२३ मध्ये इस्तंबूल येथे झालेल्या युरोपीय वुशु कुंग फू चॅम्पियनशिपच्या पुरस्कार सोहळ्यात एर्बाकन याने फिलिस्तीनी ध्वज फडकवला होता. युरोपीय वुशु कुंग फू महासंघाने (डब्ल्यूकेएफई) यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी याला राजकीय प्रदर्शन म्हटले. त्याची चौकशी होईल, असे संघटनेने सांगितले होते.

नोटिसला उत्तर
संघटनेने खेळाडूला नोटीस पाठवली आहे. त्याला उत्तर देताना एर्बाकन म्हणाला, “मला माझ्या कृतीचा अभिमान आहे. पुन्हा संधी मिळाली तर मी असेच करेन. तुम्ही माझे पदक काढून घेऊ शकता. मला शिक्षा करू शकता. पण मी माझी कारकीर्द धोक्यात घालत असल्याचे माहीत आहे.”