पुण्यात रमजान ईदची तयारी उत्साहात

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 22 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

रमजान ईदनिमित्त लष्कर भागातील बाजारपेठा सजल्या आहेत. कपडे, चादरी, अत्तर, सुकामेवा, शेवई,खजूर, दूध, मटण, चिकन अशा अनेक दुकान व स्टॉलवर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे मंगळवारी दिसून आले. शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या म्हणजे लष्कर भागात जामा, उस्मानिया,कुरेशी, भंडारशहा, बाबुलशा, तंडेलवाला,कमरुद्दीन, बाबाजान दर्गाह अशा अनेक मशिदींची साफसफाई, रंगरंगोटी करत तेथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. ईदनिमित्त मित्र मंडळी व नातेवाईकांसाठीगोड पदार्थ म्हणून शिरखुर्मा व चिकन, मटणबिर्याणीची खास मेजवानी असते. विशेष म्हणजे शिरखुर्म्यासाठी लागणारा सुकामेवा मसाला हा आठ दिवस अगोदरच घरात तयार केला जातो. घरातील स्वच्छता, रंगरंगोटी, सुशोभिकरण करण्यात महिला व्यग्र असल्याचे दिसून आले.

ईदनिमित्त खरेदीसाठी महिलावर्गाने मोठ्याप्रमाणात बाजारात धाव घेतल्याचे दिसून आले.महात्मा गांधी रस्ता, भोपळे चौक, फॅशनस्ट्रीटवर मोठी गर्दी होती. चमचमणारी टिकली, खडी व जरी वर्कचे सलवार कुर्ता,बुरखा, साड्या व अन्य प्रकारचे स्टायलिश सूटबाजारात उपलब्ध आहेत. तसेच अन्य मेकअपसाहित्य, मेहंदी कोन, हार, फुले, घर सजावटीचेसाहित्य आवर्जून खरेदी केले जात आहे.

यावेळी उस्मानिया मशीदीचे मौलाना शहानूर अन्सारी यांनी ईद आणि रोजा यांचे महत्व सांगितले. ते म्हणाले, "रोजा हा माणसांना चांगले जीवनजगण्यासाठीचे प्रशिक्षण आहे. याद्वारेप्रेम, सहानभुती, गरिबीची जाणीव, गरिबांनामदत, मनावर ताबा, व्यसनांपासून दूर राहण्याचेशिक्षण मिळते. नमाज, कुराण पठण, विशेषप्रार्थना आर्दीमार्फत परमेश्वराची उपासना केलीजाते. या सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवून आनंदाचादिवस म्हणून ईद साजरी केली जाते."