सौदी अरेबियात ३२ महिला चालक चालवणार रेल्वे

Story by  test | Published by  vivek panmand • 1 Years ago
रेल्वे शेजारी सौदी अरेबियन महिला
रेल्वे शेजारी सौदी अरेबियन महिला

 

सौदी अरेबियात रेल्वे चालकांची तुकडी २०२३ मधील हज यात्रेत सहभागी होणार आहे. ते हाय स्पीड ट्रेनिंगमध्ये भाग घेणाऱ आहेत. यासंदर्भातील अधिक माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली आहे. रेल्वे चालवणाऱ्या सर्व चालक महिलाच असणार आहेत. महिलांच्या ड्रायव्हिंगला २०१८ मध्ये सौदी अरेबियात मान्यता देण्यात आली. 

 

त्याने बोलताना म्हटले आहे की, सौदी अरेबियात महिलांच्या सक्षमीकरणातही वाढ होत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सौदी अरेबियन रेल्वेने हाय स्पीड ट्रेनच्या चालक महिलांची निवड केली होती. यामध्ये पात्र ठरलेल्या ३२ महिला चालकांना पदाची मान्यता आणि पदवी प्रदान केली जाणार आहे.  सौदी अरेबियन रेल्वेकडून सांगण्यात आले आहे की, त्या महिलांचे प्रशिक्षण मागील वर्षी मार्चमध्ये सुरु केले आहे. 


सौदी अरेबिया रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यात्रेकरूंना सर्व स्थानकांवर नेण्यात येणार आहे. ही माहिती सौदी अरेबियाच्या मालकीची टेलिव्हिजन अल अरेबियाला देण्यात आली आहे. या वेळी ७२,००० यात्रेकरू प्रति तास वाहतूक करणार आहेत. एक्स्प्रेस गाड्या महामारीच्या पूर्वी असलेल्या क्षमतेनेच चालणार आहेत.  २०१८ या वर्षात ४५० किमी लांबीच्या सेवेचे उदघाटन करण्यात आले. जेद्दाह बंदरातून धावणाऱ्या अल अरमैन ट्रेनद्वारे मक्का मदिनाचा प्रवास केला जातो. यासाठी दोन तास लागतात. या सेवेच्या माध्यमातून वर्षाला ६ कोटी प्रवाशांचे वाहतूक करण्याचे उद्दिष्ट आहे. 


सौदी अरेबियात महिलांना सक्षम आणि सार्वजनिक जीवनात सामावून घेण्यात येत आहे. त्यांना सर्वच क्षेत्रात सामावून घेतले जात आहे.  सौदी अरेबियाच्या मानव संसाधन मंत्री अहमद अल राजी यांनी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मागील वर्षी राज्याच्या एकूण श्रम क्षेत्रात महिलांचा ३७ टक्के वाटा राहिलेला आहे.  २०१८ मध्ये इतिहासात पहिल्यांदाच महिलांना गाडी चालवण्याची परवानगी देण्यात आली होती. महिला चालकांवरील बंदी पूर्णपणे हटवण्यात आली होती. सौदी अरेबियातील महिलांवरील बंधने कमी करण्यात आली आहेत. 


महिला सशक्तीकरण करण्याची मोहीम सौदी अरेबियामध्ये आखण्यात आली आहे. येथील महिलांना पुरुष गार्डच्या मंजुरीशिवाय प्रवास आणि पासपोर्टसाठी अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे. किंग सलमान बिन अब्दुलझीझ यांच्यासमोर २ महिला राजदूत शपथ घेणार आहेत. त्यामध्ये ९ सौदी राजपूत शपथ घेणार आहेत. याआधीच तीन महिला राजदूत सरकार दरबारी सेवेत आहेत.  २०१९ मध्ये राजकुमारी रिमा बिंत बंदर या सौदी अरेबियाच्या इतिहासातील पहिल्या महिला राजदूत ठरल्या. त्यांना सौदी अरेबियाच्या राजपूत म्हणून अमेरिका येथे नेमण्यात आले होते.