बांगलादेशच्या हवाई दलाचे प्रशिक्षण विमान एका महाविद्यालयाच्या इमारतीवर सोमवारी कोसळून वैमानिकासह १९ जणांचा मृत्यू झाला आणि १६० जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांमध्ये १६ विद्यार्थी, दोन शिक्षकांचा समावेश होता. हा अपघात उत्तर भागात झाला.
संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 'आज दुपारी एक वाजून सहा वाजता 'एफ-७बीजीआय' या प्रशिक्षण विमानाने
उड्डाण केलेय त्यानंतर लगेचच ते दियावकरी येथील माइलस्टोन शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरामध्ये कोसळले. या अपघातानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची जीव वाचविण्यासाठी पळापळ झाली. हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेनंतर बांगलादेशी सैन्य दलातील सैनिक, अग्निशमन दल और नागरिक सुरक्षेच्या आठ गाड्यांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.
आगीचा धूर दिसला
विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली. त्यातून निघणारा आर्गाचा धूर अंतरापर्यंत दिसत होता. माइलस्टोन शाळा आणि महाविद्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले, की शाळेच्या फाटकाजवळील तीन मजली इमारतीवर विमान कोसळले. त्यावेळी वर्ग सुरू होते. यात जखमी झालेल्यांना बाहेर काढण्यात येत होते. विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षित स्थजी पाठविण्यात आले आहे.