डोनाल्ड ट्रम्प हे विनोदवीर - व्लादिमीर पुतीन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

चीनमधील शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने भारत, रशिया आणि चीन या देशांनी एकत्र येणे आणि नंतर लष्करी संचलनाच्या निमित्ताने रशिया, चीन आणि उत्तर कोरियाने एकत्र येणे यामुळे अमेरिकेने संताप व्यक्त केला.

पुतीन हे चीन व उत्तर कोरियाला हाताशी धरून अमेरिकेविरोधात कट रचत असल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर पुतीन यांनी, 'ट्रम्प यांच्याकडे चांगली विनोदबुद्धी आहे,' असे म्हणत ही टीका हसण्यावारी नेली.

चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर आलेल्या पुतीन यांनी पंतप्रधान मोदी, चीनचे अध्यक्ष जिनपिंग व उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यासह विविध देशांच्या नेत्यांशी चर्चा केली. यावर ट्रम्प यांनी 'अमेरिकेविरोधात कट रचणाऱ्या पुतीन, जिनपिंग व किम जोंग उन यांना माझ्या शुभेच्छा' अशी खोचक टिपणी समाज माध्यमातून केली. याबाबत पुतीन म्हणाले, "मागील चार दिवसांत विविध चर्चा झाल्या. त्यात अमेरिकेबाबत नकारात्मक कोणीही बोलले नाही. उलट प्रत्येकाने युक्रेन युद्ध लवकर संपण्याची आशा व्यक्त केली व ट्रम्प भेटीलाही पाठिंबा दिला. तरीही ट्रम्प यांना तसे वाटत असेल तर, त्यांच्याकडे चांगली विनोदबुद्धी आहे, असे मी म्हणेन."