"युक्रेनबरोबर सुरू असलेले युद्ध न थांबविल्यास रशियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादू," असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दिला. त्यासाठी ट्रम्प यांनी रशियाला ५० दिवसांची मुदतही दिली आहे. उत्तर अटलांटिक करार संघटनेचे (नाटो) सरचिटणीस मार्क रूट यांनी ट्रम्प यांची आज व्हाइट हाऊस येथे भेट घेतली, यानंतर माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी रशियाला इशारा दिला. त्याचप्रमाणे रशियाविरोधात लढण्यासाठी युक्रेनला अत्याधुनिक क्षेपणास्खे देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
रशियावर नाराज
"रशिया (युक्रेनबाबत) जे काही करत आहे त्यामुळे मी अत्यंत नाराज आहे. त्यांनी जर पुढील ५० दिवसांत युद्ध थांबविले नाही तर मी त्यांच्यावर १०० टक्के आयात शुल्क लावेन," असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे जे देश रशियाशी व्यापार करतात त्यांच्यावरही आयात शुल्क वाढ लागू होईल असा गर्भित इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावरही ट्रम्प यांनी यावेळी टीका केली. "आम्ही आयात शुल्काबाबत दिलेला इशारा पुतीन यांना स्पष्ट जाणीव करून देईल की, अमेरिका युद्ध थांबविण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करत आहे. त्यामुळे योग्य सौदा काय आहे हे पुतीन यांना चांगलेच समजते."
युक्रेनसाठी शस्त्रास्त्र खरेदी
युक्रेनला देण्यासाठी कॅनडा, नॉर्वे, ब्रिटन, डेन्मार्क आणि स्वीडन हे देश अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात शरबास्त्र खरेदी करणार असल्याचे रूट यांनी यावेळी सांगितले. अमेरिका युक्रेनला 'पेंट्रिऑट' ही हवाई संरक्षण क्षेपणास्व प्रणाली देणार असल्याची घोषणाही अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केली. रशियाकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांपासून युक्रेनला बचवासाठी हे पाऊल अमेरिकेने उचलले आहे. या क्षेपणास्व प्रणालीचे शुल्क युरोपिय समुदाय (ईयू) अमेरिकेला देणार आहे.
युक्रेनला काही शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवण्याची घोषणा जुलै महिन्याच्या सुरुवातीला व्हाइट हाऊसने केली होती. पण आता त्यांनी एका नवीन कराराची घोषणा केली आहे युक्रेनला पाठविण्यात येणाऱ्या काही शस्वांसाठी 'नाटो' अमेरिकेला पैसे देणार आहे.
'पुतीन केवळ गोड बोलतात'
न्यूजसीत 'फिफा' क्लब विश्व करंडकाच्या अंतिम सामन्याहून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "अध्यक्ष पुतीन यांच्याबद्दल माझी निराशा झाली आहे. ते केवळ छान-छान बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत पण ते रात्रीच्या अंधारात लोकांवर बाँबवर्षाव करतात. ते मला आवडत नाही. आम्ही युक्रेनला 'पॅट्रिऑट' पाठवणार आहोत. पण त्यांची संख्या अद्याप निश्चित झालेली नाही." त्यांना संरक्षणाची गरज असल्याने ही क्षेपणास्त्र त्यांनी हवी आहेत. ट्रम्प यांनी नाटोला देण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रांबाबतही अमेरिकेची भूमिकाही यावेळी स्पष्ट केली, आमच्यासाठी हा व्यापार असेल असे ट्रम्प म्हणाले.
ब्रिटनच्या राजघराण्याकडून ट्रम्प यांना निमंत्रण
लंडन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १७ ते १९ सप्टेंबरदरम्यान दुसऱ्यांदा ब्रिटनच्या औपचारिक दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ट्रम्प यांचे विंडसर कैंसलमध्ये राजे चार्ल्स तृतीय आणि त्यांची पत्नी कैमिला यांच्या उपस्थितीत स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती बकिंगहॅम पॅलेसने सोमवारी दिली. ट्रम्प हे राजघराण्याचे विशेषतः राजाचे समर्थक आहेत. तीन दिवसांच्या दौऱ्यात ट्रम्प यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी मेलोनिया ट्रम्प देखील असणार आहेत, असे वृत्त बकिंगहॅम पॅलेसने दिले आहे. आतापर्यंत कोणत्याही अमेरिकी अध्यक्षाला ब्रिटनच्या राजघराण्याकडून दुसऱ्यांदा निमंत्रित करण्यात आलेले नाही.