दुबईजवळ समुद्रात झालेल्या दुर्घटनेत एका भारतीय क्रू मेंबरचा मृत्यू!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

समुद्रात झालेल्या एका 'दुर्दैवी' अपघातात जहाजावरील एका भारतीय खलाशाचा (क्रू मेंबर) मृत्यू झाला आहे. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने (Indian Consulate in Dubai) शुक्रवारी या घटनेची माहिती दिली असून सर्वतोपरी मदत करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

जहाजाच्या मालकाशी संपर्क

या घटनेबाबत दूतावासाने अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र, समुद्रात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत भारतीय खलाशाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले आहे. दूतावासाने 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टद्वारे यासंबंधी माहिती दिली.

"आम्ही जहाजाच्या मालकाशी संपर्कात आहोत आणि या घटनेबाबत अधिक माहिती घेत आहोत. या प्रकरणात दूतावासाकडून प्राधान्याने शक्य ती सर्व मदत केली जाईल. आमच्या संवेदना मृताच्या कुटुंबीयांसोबत आहेत," असे दूतावासाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.