भारताच्या रोमिओ आणि ज्युली यांच्यावर तुर्कीमध्ये कौतुकाचा वर्षाव

Story by  vivek panmand | Published by  vivek panmand • 1 Years ago
टर्की बॉम्बस्फोट
टर्की बॉम्बस्फोट

 

 यांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या सहा वर्षीय मुलीचे प्राण वाचवले आहेत

 

गेल्या ६ फेब्रुवारीला बसलेल्या भीषण भुकंपाच्या धक्क्यात आतापर्यंत तुर्कीमध्ये ३४ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर २५ हजाराहून अधिक नागरिक जखमी झाले आहे.


भीषण भुकंपाच्या धक्क्यानंतर भारतासह अनेक देशांकडून तुर्की आणि सीरियाला मदत केली जात आहे. भारताकडून आतापर्यंत विविधप्रकारची मदत पोहचवण्यात आली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना शोधण्यासाठी NDRF च्या टीम काम करत आहेत.


तुर्कीला केलेल्या मदतीनंतर भारताचे सगळीकडून कौतुक होत असतानाचा आता NDRF च्या टीमसोबत गेलेल्या दोन भारतीय स्निफरचंदेखील तोंडभरून कौतुक केले जात आहे.

भीषण भुकंपानंतर इमारतींच्या ढिगाऱ्यांसमोर माणसांना जिवंत शोधण्याचे आव्हान असताना रोमिओ आणि ज्युली या दोन भारतीय स्निफर श्वानांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या सहा वर्षीय मुलीचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या कामगिरीसाठी मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे

 

एनडीआरएफची एक टीम तुर्कीच्या नुरदगी भागात मदत आणि बचाव कार्यात असताना ज्युलीने एका ढिगाऱ्याजवळ भुंकायला सुरुवात केली. त्या ठिकाणी जवानांनी धाव घेतली.

त्यानंतर रोमियोलाही त्याच ठिकाणी पाठवण्यात आले असता त्यानेही भुंकायला सुरुवात केली. यानंतर या ठिकाणी शोध घेतला असता जवानांना सहा वर्षांची मुलगी जिवंत आढळून आली.

बेरेन असे इमारतींच्या ढिगाऱ्याखालून सुखरुपपणे जिवंत काढण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे. सध्या या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

भारताकडून सर्वात पहिली मदत

6 फेब्रुवारीला तुर्की आणि सीरियात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर अवघ्या काही तासात भारताकडून सर्वात पहिले मदतीचा हात पुढे करण्यात आला.

भूकंपानंतर लगेचच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार तुर्कीत सर्व आवश्यक उपकरणं आणि चार स्निफर डॉगसह एनडीआरएफच्या दोन तुकड्या पाठवण्यात आल्या.

या ठिकाणी भारतीय लष्कराकडून फील्ड हॉस्पिटल बांधून भूकंपग्रस्तांवर उपचार केले जात असून, भारतीय स्निफर श्वानांच्या कामगिरीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी सहा वर्षांच्या मुलीचे प्राण वाचवल्याबद्दल एनडीआरएफचे कौतुक केले आहे.