आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने ओटीटी प्लॅटफॉर्म आणि चित्रपटगृहांमधील वादावर आपले मत मांडले आहे. सध्या तो त्यांच्या आगामी 'कोस्टाओ' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नवाजुद्दीन सिद्दिकीने अलीकडेच एका मुलाखतीत ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्याच्या मते, ओटीटी प्लॅटफॉर्म आता महागड्या तिकिटांचा फायदा घेत आहेत. सुरुवातीला कमी दरात चांगले चित्रपट आणि वेबसीरिज दाखवून लोकांना सवय लावल्यानंतर आता हे प्लॅटफॉर्म आपले दर वाढवत आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांसाठी ते थोडे कठीण झाले आहे.
ओटीटी विरुद्ध थिएटर या वादावर बोलताना तो म्हणाला, “दोन्ही माध्यमांचे स्वतःचे महत्त्व आहे. थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचा अनुभव मोठा असतो, तो ओटीटीवर मिळत नाही. मात्र, ओटीटीमुळे लोकांना घरबसल्या चांगल्या कलाकृती पाहण्याची संधी मिळाली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म ज्या पद्धतीने दरवाढ करत आहेत, ते योग्य नाही.”
नवाजुद्दीन सिद्दिकी नेहमीच स्पष्टपणे विचार मांडण्यासाठी ओळखला जातो. त्यांचा हा मुद्दा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या धोरणांवर आणि सर्वसामान्यांच्या मनोरंजनाच्या बजेटवर विचार करण्यास लावणारा आहे. आता यावर काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणे महत्ताचं असेल.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter