इराणनंतर तालिबानी सैन्याकडून पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 5 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मुंबई : पाकिस्तानी रेंजर्स आणि अफगाण तालिबानी सैनिकांमध्ये सीमा भागात भीषण चकमक झाल्याचं वृत्त आहे. कुनार-बाजौर सीमेवर ही धुमश्चक्री सुरु आहे. अद्याप पाक-तालिबान यांच्यातील चकमकींमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं अद्याप वृत्त नाही.

तेहराननं बलुचिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केल्यानंतर आणि पाकिस्ताननं इराणमध्ये प्रत्युत्तरासाठी केलेल्या हल्ल्यानंतर हे पुढचं प्रकरण घडलं आहे. हिंदुस्तान टाइम्सनं याबाबत वृत्त दिलं आहे.