पाकिस्तानमध्ये दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अचानक आलेल्या पुरामुळे किमान ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ही माहिती सोमवारी दिली.
वायव्य खैबर पख्तुनख्वा, पूर्व पंजाब, दक्षिण सिंध आणि नैऋत्य बलुचिस्तान प्रांत या भागांत जून २६ पासून पावसामुळे ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे अजून अजून पाऊस पडणार असून पूर येण्याची शक्यता आहे. महामार्गही बंद होऊ शकतात. यामुळे स्थानिकांनी घरातच थांबावे आणि पर्यटकांनी या भागांना भेट देऊ नये, असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे.
गेल्या महिन्यांत वायव्येकडील स्वात नदीत एकाच कुटुंबातील १७पर्यटक वाहून गेले होते. त्यातील चार जणांना वाचविण्यात आले आणि इतर १३ जणांचे मृतदेह नंतर सापडले. तेव्हापासून आपत्कालीन सेवा कमालीची दक्ष आहे.