पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये आत्मघाती हल्ला

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 1 Months ago
पाकिस्तानमधील आत्मघाती हल्ला
पाकिस्तानमधील आत्मघाती हल्ला

 

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये एक मोठा आत्मघाती हल्ला झाला आहे.या दहशतवादी हल्ल्यात 5 चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात पाच चिनी नागरिक आणि एक स्थानिक ड्रायव्हरही मारले गेले, अशी माहिती पोलिसांनी स्थानिक माध्यमांना दिली.

पाकिस्तानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सहा चिनी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. हल्लेखोराने त्यांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर-पश्चिम पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वामधील शांगला येथे ही घटना घडली.

मारले गेलेले चिनी पेशाने इंजिनिअर होते आणि ते पाकिस्तानात सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी काम करत होते. डॉन न्यूजनुसार, एका दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेले वाहन चिनी अभियंत्यांच्या ताफ्यात घुसवले आणि दुसऱ्या वाहनाला धडक दिली. या घटनेतील मृतांचा आकडाही वाढू शकतो.

याआधीही गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये अनेक हल्ले झाले होते, ज्यामध्ये चिनी नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते. विशेषत: पाकिस्तान आणि चीनच्या संयुक्त प्रकल्प, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला विरोध होत आहे, त्यामुळे हे हल्ले झाले आहेत, अशी चर्चा आहे.