आक्रमक इस्राईलने संयम बाळगावा

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इराणने जरी शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या साह्याने हल्ला केला असला तरी इसाईलने प्रतिहल्ला करू नये, अन्यथा भडकेल," असे आवाहन जागतिक युद्ध भडव नेत्यांनी आज इस्राईलला केले आहे. 'जी-७' देशांनीही इराणने केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करताना इस्राईलला सबुरीचा सल्ला दिला आहे.

इस्राईलने दोन आठवड्यांपूर्वी सीरियातील दूतावासावर केलेल्या हल्ल्यात इराणच्या लष्कराच्या दोन अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला होता. त्याचा सूड म्हणून इराणने शनिवारी रात्री इस्राईलवर सुमारे तीनशे ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. इराणने इसाईलवर केलेला हा पहिलाच थेट हल्ला होता. इस्राईलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेमुळे ९९ टक्के क्षेपणास्त्र आणि ड्रोन हवेतच नष्ट झाले होते. मात्र, या हल्ल्यानंतर पश्चिम आशियामध्ये नव्या युद्धाचे ढग जमा झाले आहेत. योग्य वेळ येताच प्रत्युत्तर देऊ, असा इशारा इस्राईलने दिला आहे.

या पार्श्वभूमीवर विविध देशांच्या प्रमुखांनी इस्त्राईलला प्रतिहल्ला न करण्याचा सल्ला दिला आहे. इसाईलने अशा प्रकारचा हल्ला केल्यास त्याचे समर्थन करणार नाही. असे ब्रिटन आणि फ्रान्स यांनी जाहीर केले आहे. भारतानेही इस्राईलला संघर्ष न वाढविण्याचा सल्ला दिला आहे. 

संयुक्त राष्ट्रांची बैठक निर्णयाविना
इराणच्या हल्ल्यानंतर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांव्या सुरक्षा परिषदेची रविवारी तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. संघर्ष टाळणे आणि तणाव कमी करणे, ही प्राथमिकता असल्याचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी यावेळी सांगितले. इराणने केलेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा परिषदेकडूनच कारवाई होणे आवश्यक आहे. अशी भूमिका अमेरिकेने मांडली. 

अमेरिकेकडून राजनैतिक हालचालींना वेग
■ अध्यक्ष ज्यो बायडेन यांची जी-७ गटाबरोबर, तसेच जॉर्डनचे राजे अब्दुल्ला व इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा. मध्यस्थीसाठी प्रयत्न.

■परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांची जॉर्डन, सौदी अरेबिया, तुर्किये आणि इजिप्तबरोबर दूरध्वनीवरून चर्चा

■ संरक्षण मंत्री ऑस्टिन लॉईड यांची सौदी अरेबिया आणि इसाईलबरोबर दूरध्वनीवरून चर्चा

कोण काय म्हणाले?
जिलाड एर्डन, राजदूत, इसाईल : मार बसल्यावर रडत बसायला इस्राईल म्हणजे लहान बाळ नाही.

■ सईद इरावनी, राजदूत, इराण : स्वसंरक्षणासाठीच आम्ही ही कृती केली. ती करणे अत्यंत आवश्यक आणि योग्य होते.

अमेरिकेकडून राजनैतिक हालचालींना वेग

■ अध्यक्ष ज्यो बायडेन यांची जी-७ गटाबरोबर, तसेच जॉर्डनचे राजे अब्दुल्ला व इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा. मध्यस्थीसाठी प्रयत्न.

■परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांची जॉर्डन, सौदी अरेबिया, तुर्किये आणि इजिप्तबरोबर दूरध्वनीवरून चर्चा

■ संरक्षण मंत्री ऑस्टिन लॉईड यांची सौदी अरेबिया आणि इसाईलबरोबर दूरध्वनीवरून चर्चा

■ डेव्हिड कॅमेरॉन, परराष्ट्र मंत्री, ब्रिटन : ही वेळ हल्ला करण्याची नाही, तर कणखर आणि स्मार्ट बनण्याची तसेच डोक्याचा आणि हृदयाचाही वापर करण्याची आहे.

■ इमॅन्यूएल मॅक्रॉन, अध्यक्ष, फ्रान्स : संघर्ष वाढू नये यासाठी आम्ही हरप्रकारे प्रयत्न करू. इसाईलनेही प्रतिहल्ल्याचा विचार सोडून द्यावा.

■ अॅनालिना बारवॉक, परराष्ट्र मंत्री, जर्मनी: हल्ल्यानंतर ड्राण एकटा पहला आहे. त्यामुळे या देशाने आता संघर्ष वाढवू नये.

गाझामधील हानी
इराणच्या हल्ल्यानंतरही इसाईलने गाझामधील कारवाई थांबविली नसून मागील २४ तासांमध्ये हल्ल्यात ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या हानीचा आढावा

पॅलेस्टिनींचा मृत्यू : ३३,७९७ 
इस्रायलींचा मृत्यू : १२०० 
जखमी : ७६,४५६