इसाईलच्या सैन्याने रविवारी मध्य गाझामधील काही भागांसाठी नवीन स्थलांतर सूचना जारी केल्या. मध्य गाझातील या भागात सैन्याने क्वचितच लष्करी कारवाई केली आहे. या स्थलांतरामुळे अरुंद पट्टधामधील देर अल-बलाह शहराचा रफाह आणि खान युनिस या दक्षिणेकडील शहरांशी असलेला संपर्क तुटतो. इस्माईल आणि हमास कतारमध्ये शस्त्रसंधीबाबत चर्चा करीत असतानाच इस्लाईलच्या सैन्याने याबाबतचा इशारा दिला आहे. अर्थात इलाईल हमासमध्ये चर्चेबाबत अद्याप कोणतीही ठोस प्रगती झाली नसल्याचेही आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
गाझामधील इस्रायलो लष्करी कारवायांचा विस्तार केल्याने हमासवर वाटाघाटीसाठी दबाव येईल, असे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी वारंवार सांगितले आहे. स्थलांतर आदेश लागू केलेल्या गाझा पट्टीच्या भागात अनेक आंतरराष्ट्रीय संस्था मदत वाटप करीत आहेत, लष्करी प्रवक्ते अविचाय अड़ायी यांनी हमासच्या दहशतवाद्यांवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. गाझाच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेला एका ओसाड भागात एक छावणी आहे. इलाईलच्या लष्कराने त्याला मानवतावादी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. ओलिसांच्या कुटुंबांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 'द होस्टेजेस फॅमिली फोरम' या स्थानिक संघटनेने स्थलांतराच्या घोषणेचा निषेध केला आहे आणि पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू तसेच इस्त्राईलच्या लष्कराने मध्य गाझामधील कारवाईमागचा उद्देश स्पष्ट करावा, अशी मागणी केली आहे. गाझा पट्टीमध्ये सातत्याने इस्खाईलची मनमानी सुरू असून, कोणतेही ठोस धोरण आखले जात नाही, असेही संघटनेने म्हटले आहे.