World Television Day 2023 : टीव्हीशी निगडीत ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Story by  आवाज़ मराठी | Published by  sameer shaikh • 8 Months ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

सध्याच्या घडीला मनोरंजनाची असंख्य साधने उपलब्ध आहेत. विविध प्रकारची गॅजेट्स, मोबाईल, टॅब्स, रेडिओ, ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि बरच काही उपलब्ध आहे. मात्र, एवढ सगळ असूनही आपल्या सर्वांच्या आयुष्यात टेलिव्हिजनचे स्थान हे फार वेगळे आहे.

आपल्या सर्वांच्या आठवणी या टेलिव्हिजनशी जोडल्या गेल्या आहेत. अगदी लहानपणापासून ते आतापर्यंत. मग तो ब्लॅक आणि व्हाईट टीव्ही असुदे किंवा आताचा रंगीत HD टीव्ही. मालिका, विविध प्रकारचे कार्यक्रम, कार्टून्स, बातम्या असं बरच काही आपण या टीव्हीवर पाहिले आहे आणि पाहत आहोत.

८० आणि ९० च्या दशकामध्ये टेलिव्हिजनचा सर्वाधिक विस्तार झाला. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. टीव्हीचा संघर्ष आणि टीव्हीचे भविष्य यावर चर्चा करण्यासाठी जगभरात दरवर्षी २१ नोव्हेंबरला ‘जागतिक टेलिव्हिजन दिन’ साजरा केला जातो. आज जागतिक टेलिव्हिजन दिन आहे, त्यानिमित्ताने आज आपण टीव्हीशी निगडीत काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.

भारतात टीव्ही कधी दाखल झाला?
जगात सर्वात प्रथम टीव्हीचा शोध किंवा टीव्हीची निर्मिती ही अमेरिकेचे वैज्ञानिक जॉन लॉगी बेयर्ड यांनी १९२७ मध्ये केली होती. मात्र, खऱ्या अर्थाने १९३४ मध्ये टीव्हीला पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक स्वरूप प्राप्त झाले. त्यानंतर, अनेक आधुनिक टेलिव्हिजन स्टेशन्स जगभरात सुरू करण्यात आले होत.

मात्र, हे सर्व जगभरात घडत असताना भारतात १९५० मध्ये टेलिव्हिजन दाखल झाला. चेन्नईत एका इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याने प्रदर्शनात सर्वात प्रथम दूरदर्शन सादर केला होता.

तसेच, भारतातील कोलकाता येथे राहणाऱ्या एका श्रीमंत नियोगी कुटंबाने भारतातील पहिला टेलिव्हिजन सेट खरेदी केला होता. त्यानंतर, १९६५ मध्ये ऑल इंडिया रेडिओने दररोज प्रसारित होणारे टिव्ही प्रसारण देखील सुरू केले होते.

त्यानंतर, सरकारने १९७६ मध्ये ऑल इंडिया रेडिओपासून टीव्ही वेगळा केला. त्यानंतर, पहिली राष्ट्रीय दूरचित्रवाहिनी १९८२ मध्ये सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे याच वर्षी भारतात पहिला रंगीत टीव्ही देखील दाखल झाला.

टीव्हीशी निगडीत रंजक गोष्टी
  • 1936 मध्ये जगभरातील एकूण २०० घरांमध्येच फक्त टेलिव्हिजनचा वापर केला जात होता.
  • त्यानंतर, १९४८ मध्ये सर्वात आधी टेलिव्हिजनचे संक्षिप्त रूप म्हणून ‘टीव्ही’ या शब्दाचा वापर करण्यात आला होता.
  • ब्रिटीश कंपनी टायटनच्या मदतीने जगातील सर्वात मोठा टीव्ही तयार करण्यात आला आहे.

- मोनिका लोणकर -कुंभार