अल खिज़र सोसायटीतर्फे दहावी-बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
अल खिज़र सोसायटीतर्फे आयोजित दहावी-बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात सहभागी विद्यार्थी
अल खिज़र सोसायटीतर्फे आयोजित दहावी-बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात सहभागी विद्यार्थी

 

जळगावमधील फैजपूर येथील अल खिज़र सोसायटीतर्फे दहावी, बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. जळगाव येथील इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल करीम सालर अध्यक्षस्थानी होते. शहरातील खिरोदा रस्त्यावर आयोजित या कार्यक्रमात बोदवडचे माजी नगरसेवक जफर शेख, डॉ. आदिल खान, हाजी शब्बीर शेख, हारून बागवान, आसिफ मजीद मनियार, रमजान कादर मनियार, रिजवान मानियार (रावेर) यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. 

शहरासह परिसरातील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. माँ आयशा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. अल खिज़र सोसायटीचे अध्यक्ष डॉ. दानिश यांनी प्रास्ताविक केले. अब्दुल करीम सालर, मजीद जकरिया, धनंजय चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाला अफसर खान, शकील शेख, अलीम शेख, हकीम चौधरी, इलियास शेख यांच्यासह यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव, जळगाव, भुसावल व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. भुसावळचे शायर हारून उस्मानी यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वितेसाठी अल खिज़र सोसायटीचे अध्यक्ष डॉ. दानिश, सचिव एजाज शेख, उपाध्यक्ष काजी मुजम्मील, रफिक शेख, अल्ताफ खान, मोहंमद अख्तर, अयाज शेख, शोएब शेख, वसीम शेख, डॉ. कैफ आदींचे सहकार्य लाभले.