महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना पहिलीपासून देणार सैन्य प्रशिक्षण : शिक्षणमंत्री भुसे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

महाराष्ट्रात पहिलीपासून विद्यार्थ्यांना मूलभूत सैन्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, असं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी ३ जून २०२५ रोजी सांगितलं. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि नियमित व्यायामाची सवय लागेल.

“पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैन्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. याने देशप्रेम वाढेल, व्यायामाची सवय लागेल आणि शिस्त येईल,” भुसे म्हणाले. माजी सैनिकांना प्रशिक्षणासाठी सामावून घेतलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रस्ताव राबवण्यासाठी राज्यातील २.५ लाख माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC), स्काउट्स आणि गाइड्स यांची मदत घेतली जाईल, असं शिवसेना नेते असलेल्या भुसे यांनी सांगितलं. 
 'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter