महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल जाहीर; ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता दहावीचा (SSC) निकाल शुक्रवारी जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

निकालात कोकण विभाग अव्वल

राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी निकालाची अधिकृत घोषणा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.९६ इतकी आहे, तर त्या तुलनेत ८९.५६ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. विभागनिहाय निकालाचा विचार केल्यास, कोकण विभागाने ९७.६२ टक्के निकाल नोंदवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजेच ८८.४१ टक्के लागला आहे.

इतर विभागांची कामगिरी

राज्यांतील इतर विभागांच्या निकालाची आकडेवारीही जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ९५.४७ टक्के लागला आहे. याशिवाय पुणे विभागाचा निकाल ९४.२४ टक्के, मुंबई ९४.९७ टक्के, अमरावती ९०.५० टक्के, लातूर ८८.४२ टक्के आणि नाशिक विभागाचा निकाल ९०.५३ टक्के लागला आहे.