प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल जाहीर

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 11 Months ago
विद्यार्थी
विद्यार्थी

 

राज्यात २१ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. त्यानंतर आज बारावीचा निकाल २ वाजता ऑनलाईन जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

यंदा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. १२ वीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९६.१ टक्के लागला आहे. तर मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.३४ टक्के इतकी आहे.

मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ४.६९ टक्के अधिक आहे. त्यामुळे १२ वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. गेल्यावर्षीपेक्षा १ टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. दिव्यांग श्रेणीत ९३ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. यंदा ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी १४ लाख ५७ हजार २८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. त्यामुळे आता लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलेले होते.

निकाल जाहीर झाल्यानंतर २६ मे पासून ५ जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २६ मे ते १४ जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका ५ जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.

ऑनलाईन निकाल कसा पाहाल?
महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे. निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेत स्थळ www.mahresult.nic.in ला व्हिजिट करा. होम पेजवर जा आणि महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल २०२३ महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल २०२३ लिंकवर क्लिक करा. तुमचा रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहिती भरा. परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

कसा चेक कराल आपला निकाल? 
महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पोर्टल www.mahresult.nic.in वर लॉन ऑन करा.
बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका.
तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा.
एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.