सलमान खानचे चाहत्यांना ईदचे मोठे गिफ्ट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Months ago
सलमानच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर
सलमानच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर

 

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा चित्रपट हा ईदला प्रदर्शित होणार हे ठरलेलं असतं. दरवर्षी ईदच्या दिवशी सलमान खानचा चित्रपट प्रदर्शित होतो. परंतु यंदा भाईजानचा चित्रपट रिलीज झालेला नाहीये. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत होती. परंतु आता सलमान खानने ईदच्या दिवशी चाहत्यांना नवीन चित्रपटाची घोषणा करत खुशखबर दिली आहे. 

सलमान खानचा नवीन चित्रपट पुढच्या वर्षीच्या ईद मूहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानने सोशल मीडियावर नवीन चित्रपटाचे पोस्टर शेअर करत माहिती दिली आहे. 'सिकंदर' असे सलमानच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. ए. आर. मुरगदास या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नाहीये.
 
सलमान खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 'या वर्षी ईदला बडे मियाँ, छोटे मियाँ चित्रपट बघा आणि पुढच्या ईदला सिकंदरला भेटायला या. तुम्हाला सर्वांना ईद मुबारक'. असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आले आहे.
'सिकंदर' हा चित्रपट प्रसिद्ध निर्माते साजिद नाडियालवाला यांच्या बॅनरखाली निर्मित होणार आहे. सलमान खानचा हा नवीन चित्रपट चाहत्यांसाठी मोठं गिफ्ट असल्याचे म्हणायला हरकत नाही. सलमान खानचा याआधी दरवर्षी ईदला नवीन चित्रपट प्रदर्शित व्हायचा. मात्र, यावर्षी सलमान खानने हा नियम मोडला असला तरीही त्याने नव्या चित्रपटाची घोषणा करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.