विसर्जन मिरवणुकीत सलमानचा दबंग डान्स

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान अॅक्शन आणि कौटुंबिक चित्रपटांसाठी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 'मैने प्यार किया', 'हम आपके हैं कौन', 'दबंग' ते 'किक' अशा सुपरहिट चित्रपटांतून त्याने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याची बहीण अर्पिता खान शर्मा आणि जावई अभिनेता आयुष शर्मा यांचं गणेशोत्सवाचं आयोजन हे नेहमीच चर्चेत असतं. 

यंदाही गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सलमानची उपस्थिती चाहत्यांसाठी आकर्षण ठरली. नेहमीप्रमाणेच त्याच्या डान्सवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. गुरुवारी मुंबईत अर्पिता-आयुष यांच्याकडील गणपती विसर्जनात सलमान खान उत्साहाने सहभागी झाला. ढोल-ताशांच्या तालावर सलमान बहीण अर्पिता आणि सोनाक्षी सिन्हासोबत थिरकताना दिसला. त्याच्यासोबत सोनाक्षीचा पती झहीर इकबालही डान्समध्ये रंगून गेला. सलमानचे पुतणे अरहान खान आणि निर्वाण खानदेखील डान्समध्ये सहभागी झाले. 

एका व्हिडिओमध्ये सलमान आपल्या भाच्याला, अहिल शर्माला डान्समध्ये खेचण्याचा प्रयत्न करताना दिसतो, मात्र गोंडस अहिल नाचण्याऐवजी गर्दीतून पळून जाताना चाहत्यांना पाहायला मिळाला. हा खेळकर क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांनी सलमानच्या कौटुंबिक प्रेमाचं कौतुक केलं आहे.