YouTube च्या प्रमुख पदी भारतीय वंशाचे नील मोहन

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
neel mohan
neel mohan

 

 

जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म  यूट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुसान वोजिकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यूट्यूबची मूळ कंपनी ‘अल्फाबेट इंकने’ ही माहिती दिली. भारतीय वंशाचे नील मोहन आता यूट्यूबचे नवे सीईओ असतील, असे कंपनीने सांगितले आहे. नील मोहन युट्युबच्या सीनियर वाइस-प्रेसिडेंटची भूमिकाही पार पाडणार आहेत.

 

 

 

नील मोहन सध्या युट्युबचे मुख्य उत्पादन अधिकारी आहेत. नोव्हेंबर २०१५ मध्ये ते यूट्यूबशी जोडले गेले होते. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, नील मोहन यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून एमबीए केले आहे आणि त्याने एक्स्चेंज कंपनीमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे.

 

याशिवाय युट्युबची मूळ कंपनी ‘अल्फाबेट’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ सुंदर पिचाई हे देखील भारतीय वंशाचे आहेत. गुगल सुद्धा याच अल्फाबेट कंपनीच्या मालकीचे आहे. नील मोहन यांची ही  नियुक्ती सिलिकॉन व्हॅलीमध्ये भारतीय वंशाच्या लोकांचा वाढता प्रभावाची झलक दाखवते.

 

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, अॅडोबचे सीईओ शंतनू नारायण आणि आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा यांच्यासह जगातील अनेक मोठ्या-टेक कंपन्यांमध्ये सध्या भारतीय वंशाचे सीईओ कार्यरत आहेत.

 

युट्युब आणि गुगल ची ही  मूळ कंपनी?

अल्फाबेटही अमेरिकन कंपनी गूगल, कॅलिको, गूगल-एक्स, नेस्ट-लॅब यांची मातृसंस्था असून, ती इतर अनेक सेवा पुरवते. गूगलच्या पुनर्बांधणीसाठी ऑगस्ट २०१५ मध्ये अल्फाबेटची स्थापना करण्यात आली.