काय असेल लिंक्डइनचा नवीन फिचर?, एआय टूल मदत करणार?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 2 Years ago
लिंक्डइन
लिंक्डइन

 

नोकरी शोधण्यासाठी कित्येक ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. यांपैकी लिंक्डइन ही एक लोकप्रिय वेबसाईट आहे. आपल्या यूजर्सना नोकरी शोधणं आणि अप्लाय करणं या प्रक्रिया अधिक सुलभ व्हाव्यात यासाठी आता ही कंपनी प्रयत्न करत आहे. यासाठी ही कंपनी आता एआयची मदत घेणार आहे.

लिंक्डइन कोच
कंपनी सध्या 'लिंक्डइन कोच' नावाच्या एआय फीचरवर काम करत आहे. हे एआय टूल आपल्या यूजर्सना सर्व प्रकारची मदत करणार आहे. नवीन नोकऱ्या शोधणं, नोकरीसाठी अर्ज करणं, नोकरीसाठी नवीन कौशल्य आत्मसात करणं, आपलं नेटवर्क बिल्ड करणं, अशा सर्व गोष्टींसाठी हे टूल मदत करेल. अ‍ॅप रिसर्चर असणाऱ्या नीमा ओवजी यांनी या फीचरची माहिती दिली आहे.

 

लिंक्डइनच्या प्रवक्त्या अमँडा पुर्विस यांनी या टूलचे आधीच संकेत दिले होते. 'यूजर्सचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी कंपनी नेहमीच नवनवीन गोष्टींच्या शोधात असते. लवकरच आम्ही यूजर्ससाठी भरपूर गोष्टी आणणार आहोत.' असं त्या म्हणाल्या होत्या.


एआयचं खास फीचर
आपल्यापैकी बऱ्याच जणांना स्वतःबद्दल नेमकं काय लिहायंच हेच कळत नाही. यासाठी एका एआय चॅटबॉटची चाचणी लिंक्डइन करत आहे. हा चॅटबॉट एखाद्या यूजरबद्दल क्षणात माहिती लिहून काढेल. यूजर्स नंतर ही माहिती पोस्ट स्वरुपात आपल्या नेटवर्कसोबत शेअर करू शकतील.