भारतीय मसाले आणि औषधी वनस्पतींमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण अधिक?

Story by  Saurabh Chandanshive | Published by  Saurabh Chandanshive • 13 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) भारतीय मसाल्यांमध्ये तसेच औषधी वनस्पतींमध्ये जास्त प्रमाणात कीटकनाशके असण्याला परवानगी दिल्याचा दावा करणाऱ्या मीडिया रिपोर्ट्स फेटाळल्या आहेत. या रिपोर्ट्समध्ये भारतात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया मसाले आणि औषधी वनस्पतींमध्ये स्टँडर्डपेक्षा १० पट अधिक कीटकनाशके मिसळण्यास मंजूरी देते असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर FSSAI ने हे रिपोर्ट्स खोटे आणि दुर्भावनापूर्ण असल्याचे म्हटले आहे.

FSSAI ने एका प्रेस रिलीजमध्ये याबद्दल माहिती दिली आहे की, या प्रकारच्या सर्व रिपोर्ट खोटे आणि बिनबुडाचे आहेत. भारतात मॅक्सिमम रेसेड्यू लेव्हल (MRL) म्हणजेच कीटकनाशक असण्याची लिमीट जगभरातील सर्वात कडक स्टँडर्ड्सपैकी एक आहे. कीटकनाशकांचे MRL त्यांच्या धोक्याच्या आकलनाच्या आधारावर वेगवेगळ्या फूड मटेरियलसाठी वेगवेगळी ठरवली जाते.

असे असले तर FSSAI ने मान्य केले की काही कीटकनाशके, जे भारतात केंद्रीय कीटकनाशक बोर्ड आणि रजिस्ट्रेशन कमेटी (CIB & RC) कडे रडिस्टर्ड नाहीत. त्यांच्यासाठी ही लिमिट ०.०१ mg/kg पेक्षा १० पटीने वाढवून ०.१ mg/kg करण्यात आली होती.

हे वैज्ञानिक पॅनलच्या रेकमेंडेशनवरच करण्यात आले होते. CIB & RC कीटकनाशकांची मॅन्युफॅक्चरिंग, इंपोर्ट-एक्सपोर्ट, ट्रांसपोर्ट आणि स्टोरेज इत्यादींना रेगूलेट करते.

CIB आणि RC कडे जवळ २९५ हून अधिक कीटकनाशके रजिस्टर्ड आहेत. यापैकी १३९ कीटकनाशकांचा वापर मसाल्यांमध्ये केला जाऊ शकतो, तर कोडेक्सने एकूण २४३ कीटकनाशकांना अडॉप्ट केले आहे. यामध्ये ७५ मसाल्यांमध्ये वापरले जाऊ शकते.

FSSAI ने दिलेल्या माहितीनुसार मिरची पावडरमध्ये मिसळले जाणारे मायक्लोबुटानिलसाठी CODEX ने २० mg/kg ची अधिकतम लिमीट निश्चित केली आहे. तर FSSAI याला फक्त २ mg/kg पर्यंत मिसळण्याची परवानगी देते.

याच प्रकरे इतर पेस्टिसाइड स्पाइरोमेसिफेनसाठी कोडेक्स ने ५ mg/kg ची लिमीट निश्चित केली आहे. मात्र FSSAI यासाठी १ mg/kg पर्यंत परवानगी देते.

काळ्या मिऱ्यांमध्ये मेटालॅक्सिल आणि मेटालॅक्सिल - एम च्या वापरासाठी कोडेक्स ने २ mg/kg ची मर्यादा ठेवली आहे. तर FSSAI याला फ्कत 0.5 mg/kg पर्यंत मिसळण्याची परवानगी दिली जाते.

कोडेक्स ग्राहकांची रक्षा करणे तसेच फूड बिझनेसवर लक्ष ठेवणारी एक ग्लोबल संस्था आहे, ही इंटरनॅशनल सरकारी आणि गैर सरकारी संस्थांच्या मध्ये फूड स्टँडर्ड ठरवणे आणि लागू करण्याची परवानगी देते.

प्रकरण काय आहे?
मागिल महिन्यात सिंगापूर, हाँगकाँग आणि मालदीव येथे भारतीय मसाले ब्रँड एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर अमेरिकन फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) देखील कंपनीच्या मसाल्यांची तपासणी करत आहे.

FSSAI देखील करतंय कंपन्यांच्या फॅक्टऱ्यांची चौकशी
नुकतेच FSSAIने देखील मसाला पावडर तयार करणाऱ्या कंपन्यांच्या मॅनिफॅक्चरिंग यूनिट्सचे इंस्पेक्शन, सँपलिंग आणि टेस्टिंग करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय फूड रेग्युलेटर संस्थेने सर्व कंपन्यांच्या प्रॉडक्टस्मध्ये एथिलीन ऑक्साइडचे प्रमाण देखील तपासण्याचे आदेश दिलेत.

हाँगकाँगच्या फूड सेफ्टी डिपार्टमेंटने सांगितले की, एमडीएच ग्रुपते तीन मसाला मिक्स - मद्रास करी पाऊडर, सांभर मसाला पाऊडर आणि करी पाऊडर मध्ये एथिलीन ऑक्साइडचे प्रमाण जास्त आढळून आलो होते. तसेच एव्हरेस्टच्या फिश करी मसाला मध्ये देखील कार्सिनोजेनिक पेस्टिसाइड आढळून आले होते.