महाराष्ट्रात मंगळवारी ६७ नव्या कोविड-१९ रुग्णांची नोंद झाली. यात मुंबईत १७ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत दोघांचा मृत्यू झाला, असं राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितलं. यंदा जानेवारीपासून आतापर्यंत २,१०८ रुग्ण सापडले. मृत्यूंची संख्या ३१ वर पोहोचली. यापैकी ३० रुग्णांना इतर आजार होते. ठाणे आणि सोलापूर येथे प्रत्येकी एक मृत्यू नोंदवला गेला.
मुंबईत सर्वाधिक १७ रुग्ण सापडले. यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या ८८० झाली. यात जून महिन्यातील ४३९ रुग्णांचा समावेश आहे. सोलापूर महापालिका क्षेत्रात १६ आणि पुणे नागरी भागात १४ नवे रुग्ण आढळले. राज्य आरोग्य विभागाने जानेवारीपासून २०,४६८ नमुने तपासले. यापैकी २,१०८ नमुने पॉझिटिव्ह आले. रुग्णांचे प्रमाण कमी असले, तरी प्रशासन सतर्क आहे. कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं दिसताहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे. नागरिकांना मास्क वापरणं आणि खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter