कोरोना महासाथीच्या काळात देण्यात आलेली प्रतिबंधक लस आणि अचानक होणारे मृत्यू यांचा परस्पर संबंध नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहे.
कर्नाटकातील हासन जिल्ह्यात हृदयविकाराने मरण पावणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली होती. मध्यंतरी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या प्रतिबंधक लसीचा अचानक होणाऱ्या मृत्यूंशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. आता आरोग्य मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले.
'अचानक होणाऱ्या मृत्यूंचा थेट संबंध कोरोना प्रतिबंधक लशींसोबत आहे का,' याचा तपास 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' आणि 'नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल' संस्थांमार्फत करण्यात आला होता. मात्र याबाबतच्या दाव्यांत फारसे तथ्य आढळून आले नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले. ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असून तिचे दुष्परिणाम झाल्याची उदाहरणे दुर्मीळ आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले.