हज २०२६ चा सर्वात अहम दिवस म्हणजे 'यौम-ए-अराफा'. या दिवशी मस्जिद-ए-नमिरा इथे हजचा खुत्बा (प्रवचन) पार पडला.
मस्जिद-ए-नबवीचे इमाम शेख अब्दुर रहमान अल-हुजैफी यांनी मुस्लिमांना सबर, इबादत आणि तौहीद (एकेश्वरवाद) यांचं पालन करण्याचं अपील केलं. ते म्हणाले, "सबर बाळगणाऱ्यांना अल्लाहाने अमाप फळ देण्याचा वादा केला आहे." जगभरातून आलेल्या लाखो भाविकांना संबोधित करताना त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की, माणसाने फक्त अल्लाहाचीच इबादत करावी आणि फक्त त्याचाच खौफ बाळगावा.
मस्जिद-ए-नमिरा इथे लाखो हाजींच्या हाजिरीत हा ऐतिहासिक खुत्बा झाला. यावेळी संपूर्ण अराफात मैदान 'लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक'च्या आवाजाने दुमदुमून गेलं. हज मजहबी सफर आहे तशी ती रुहानी पाकीजगी मिळवण्याचा, तौबा करण्याचा आणि अल्लाहाच्या करीब जाण्याचा सर्वात मोठा जरियाही आहे, असे इमाम अल-हुजैफी यांनी सांगितलं.
Hajj Khutbah 1447
— Motivation with Faith (@MWFaithOfficial) May 26, 2026
In the blessed plain of Arafah, Sheikh Ali Al-Hudhaify delivers the sacred words.
Hearts gathered from every corner of the world, beating as one. May this Khutbah bring guidance, unity, and mercy to the Ummah. pic.twitter.com/kmdZAFoqve
"अल्लाहाला राजी करण्यासाठी आणि त्याची रहमत व मगफिरत (क्षमा) मिळवण्यासाठी भाविक दूरवरून आणि मुश्किल सफर करून इथे आले आहेत," असे ते म्हणाले. कुराणमधील आयतींचा हवाला देत त्यांनी एक मोठा पैगाम दिला. अल्लाह सबर ठेवणाऱ्यांना अमाप फळ देतो. तसेच खऱ्या मनाने त्याच्या मार्गावर चालणाऱ्यांसाठी जन्नतची खुशखबरी असते, असं ते म्हणाले.
इमाम यांनी आपल्या खुत्ब्यात तौहीदच्या अहमियतवर भर दिला. आखिरतची (मृत्यूनंतरच्या जगाची) तयारी करण्याचा सर्वात मोठा रस्ता म्हणजे अल्लाहाची इबादत करणे आणि त्याच्यासोबत इतर कुणालाही शरीक न करणे होय. ते म्हणाले, "माणसाने आपले दिल आणि अमल या दोन्ही गोष्टींमध्ये अल्लाहच्या इबादतला अव्वल मुकाम दिला पाहिजे."
अराफाचा दिवस इस्लामिक कॅलेंडरमधील सर्वात मुकद्दस दिवसांपैकी एक मानला जातो. याच दिवशी इसवी सन ६३२ मध्ये पैगंबर मोहम्मद (स.) यांनी त्यांच्या शेवटच्या सफरीदरम्यान (हज्जतुल विदा) अराफातच्या मैदानात ऐतिहासिक खुत्बा दिला होता. या खुत्ब्यात इन्साफ, मसावात (समता), इंसानी जान आणि मालमत्तेची हिफाजत आणि मुआशरती (सामाजिक) इन्साफ यांसारख्या उसूलांवर भर देण्यात आला होता. याच कारणास्तव दरवर्षी अराफाच्या दिवशी जगभरातील मुस्लिम या ऐतिहासिक मुकामाशी जज्बाती तौरवर जोडले जातात.
यावेळीही लाखो भाविक पहाटेपासूनच अराफातच्या मैदानात नमाज, कुराणची तिलावत, दुआ आणि मगफिरत मागण्यात मश्गूल असल्याचं दिसलं. सूर्योदयापासून ते दुपारपर्यंत अराफातच्या मैदानात १६ लाखांहून अधिक भाविक हाजिर असल्याचा अंदाज आहे. सगळीकडे लोक हात उंचावून आपल्या गुनाहांची मगफिरत मागताना आणि दुनियेत अमन आणि भाईचारा नांदावा यासाठी दुआ करताना दिसत होते.
لبيك اللهم لبيك!
— Haramain Archive (@muslimmakkah) May 26, 2026
In a majestic scene, the Hajj pilgrims on Jabal Al Rahma in Arafat.#Hajj #Hajj2026 #يوم_عرفة pic.twitter.com/xT5TpbYP9r
पहाटेपासूनच 'जबल-ए-रहमा' आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात मोठी गर्दी उसळली होती. इस्लामिक इतिहासात या टेकडीला खास अहमियत आहे. याच ठिकाणी पैगंबर आदम आणि पैगंबर हव्वा यांची मुलाकात झाली होती, असं मानलं जातं. भाविक इथे खास दुआ करण्यासाठी आणि आपल्या जिंदगीची एक नवी सुरुवात करण्यासाठी येतात.
मीना वादीतून भाविकांना अराफात मैदानात नेण्याचा अमल रात्रीपासूनच सुरू झाला होता. मशायर गाड्या, विशेष बसेस आणि इतर ट्रान्सपोर्ट व्यवस्थेचा वापर करून लाखो हाजींना टप्प्याटप्प्याने अराफातला हिफाजतने पोहोचवण्यात आले. कोणतीही गर्दी किंवा गोंधळ टाळण्यासाठी ही संपूर्ण व्यवस्था अतिशय शिस्तबद्ध आणि तांत्रिकदृष्ट्या मजबूत असेल, याची सौदी प्रशासनाने पूर्ण काळजी घेतली.
भाविकांना सहज फिरता यावं यासाठी मस्जिद-ए-नमिरा, जबल-ए-रहमा आणि इतर प्रमुख ठिकाणांवरून येणारे आणि जाणारे रस्ते वेगळे करण्यात आले होते. सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतूक पोलीस, सुरक्षा संस्था आणि स्काऊट पथकं तैनात करण्यात आली होती. भाविकांना रस्ता दाखवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी विविध ठिकाणी स्वयंसेवक उभे असल्याचं पाहायला मिळालं.
यंदाच्या कडक उन्हाळ्याचा विचार करून सौदी प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक खास व्यवस्था केल्या. जबल-ए-रहमाच्या आजूबाजूला जमिनीवरील एअर-कंडिशनिंग युनिट्स बसवण्यात आले होते. यामुळे संपूर्ण परिसरातील तापमान बऱ्यापैकी नियंत्रणात आलं. कडक ऊन आणि उष्ण वारं असूनही या इंतजाममुळे भाविकांना मोठा सुकून मिळाला.
यासोबतच अराफात मैदानात पाण्याचा सतत पुरवठा, वैद्यकीय सुविधा, ॲम्ब्युलन्स आणि फिरती सेहत पथकं तैनात करण्यात आली होती. कोणत्याही इमर्जन्सीला तोंड देण्यासाठी 'हिलाल-ए-अहमर'ची (रेड क्रेसेंट) पथकं पूर्णपणे सज्ज होती.
सूर्यास्तानंतर भाविक मुजदलिफाच्या मैदानाकडे रवाना होतील. तिथे ते मगरिब आणि ईशाची नमाज एकत्र अदा करतील. सैतानाला खडे मारण्याच्या रिवायतीसाठी ते तिथे खडेही जमा करतील.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter