उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दोन घरगुती गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळणार

Story by  Awaz Marathi | Published by  vivek panmand • 1 Years ago
 केंद्र सरकारवर पडणार ७६८० कोटी रुपयांचा बोजा
केंद्र सरकारवर पडणार ७६८० कोटी रुपयांचा बोजा

 

 केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा देत घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर केली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर लोकांना स्वस्त दरात स्वयंपाकाचा गॅस मिळणार आहे.

 

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नवीन अधिसूचनेनंतर, उज्ज्वला योजनेच्या 9.59कोटी लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षाला 14.2किलो एलपीजी गॅस सिलिंडरवर 200रुपये सबसिडी मिळणार आहे.

 

त्याचबरोबर सरकारने वर्षभरात 12सिलिंडर भरण्यासही परवानगी दिली आहे. याचा अर्थ असा की केंद्रीय मंत्रिमंडळाने एका आर्थिक वर्षात 12स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर 200रुपये प्रति सिलेंडर सबसिडी मंजूर केली आहे.

 

केंद्र सरकारवर किती बोजा पडणार आहे :

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 2022-23या आर्थिक वर्षासाठी एकूण 6,100कोटी रुपये आणि 2023-24या आर्थिक वर्षासाठी 7,680

कोटी रुपये खर्च होणार आहे. हा बोजा केंद्र सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

 

या' कंपन्या आधीच हे अनुदान देत आहेत :

सर्व प्रमुख तेल वितरण कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) 22मे 2022पासून हे अनुदान देत आहेत.

अनेक कारणांमुळे एलपीजीच्या किंमतीत वाढ झाल्याचे केंद्र सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे. अशा परिस्थितीत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना यापासून संरक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी अनुदान मंजूर करण्यात आल्याने गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजीचा वापर वाढला आहे :

उज्ज्वला योजनेंतर्गत अनुदान देणे सुरूच ठेवणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. म्हणजेच या योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी सबसिडीचा लाभ मिळत राहील.

PMUY लाभार्थ्यांच्या सरासरी एलपीजी वापराबद्दल बोलायचे झाल्यास, 2019-20मधील 3.01रिफिलवरून 2021-22मध्ये 3.68पर्यंत 20टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

विनाअनुदानितसिलिंडरची किंमत :

या महिन्यात केंद्र सरकारने विनाअनुदानित 14.2किलोच्या सिलिंडरमध्ये 50रुपयांची वाढ केली होती, त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजीची किंमत प्रति सिलेंडर 1,103रुपये झाली आहे.

त्याचवेळी, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 350.50 रुपयांनी वाढून प्रति सिलेंडर 2,119.50 रुपये झाली आहे.