जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला
नेशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला 'अपयशी देश' संबोधले आहे. ते म्हणाले की, जोवर पाकिस्तानमध्ये लोकशाही सरकार स्थापन होत नाही, तोपर्यंत नवी दिल्ली आणि इस्लामाबाद यांच्यातील संबंध सुधारण्याची शक्यता नाही.
"पाकिस्तानी जनता भारताशी मैत्रीची इच्छुक, मात्र सत्ताधाऱ्यांना ती नको"
एका पत्रकार परिषदेत जेव्हा त्अब्दुल्ला यन्न विचारण्यात आलं की भारत-पाकिस्तान युद्धच अंतिम पर्याय आहे का, तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं, “तणाव नक्कीच आहे, पण हे अंतिम टप्पा आहे का हे सांगणं कठीण आहे. हा निर्णय दोन्ही देशांच्या नेत्यांनी घ्यायचा आहे.”
मात्र त्याचवेळी त्यांनी जोर देऊन सांगितले की, “जोपर्यंत पाकिस्तानात सैन्याचे वर्चस्व आहे, तोपर्यंत भारत-पाक संबंध कधीच सुधारणार होणार नाहीत. पाकिस्तानची जनता भारताशी मैत्री करू इच्छिते, पण सत्ताधारी सैनिकी मानसिकतेच्या प्रभावाखाली आहेत. जेव्हा लोकांनी निवडलेले प्रतिनिधी सत्तेवर येतील, तेव्हाच खरी शांतता प्रस्थापित होईल.”
"भारताशी संघर्ष हा पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांचा जबाबदारी टाळण्याची पळवाट"
अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला ‘विफल राष्ट्र’ (failed state) संबोधले. त्यांनी सांगितले की, “पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या देशातील स्थिती सुधारण्याऐवजी, लोकांसाठी काम करण्याऐवजी, भारतविरोधी संघर्षाचा मार्ग निवडला आहे – जो केवळ जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न आहे.”
ते पुढे म्हणाले, “जर युद्ध घडलं, तर त्याचे परिणाम फारच भयावह असतील. दोन्ही देशांकडे अणुशक्ती आहे. जर ती वापरली गेली, तर काय होईल हे फक्त ईश्वरालाच माहीत.”
"काश्मीर कठीण काळातून जात आहे"
अब्दुल्ला म्हणाले की, “काश्मीर सध्या एका अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहे. पुढे काय होईल, हे सांगता येणं अशक्य आहे. दोन्ही देश युद्धासाठी सज्ज आहेत. मात्र जगभरातून प्रयत्न सुरू आहेत की हे युद्ध होऊ नये. जो कोणी हल्ल्याच्या मागे आहे, त्याला शोधून काढण्यासाठी मार्ग शोधला जात आहे. हे थांबवण्यात जग किती यशस्वी ठरेल, हे भविष्यातच कळेल.”
"पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करणे अमानुषपणाचे"
पाकिस्तानी नागरिकांना भारतातून हद्दपार करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया विचारण्यात आली, तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “मानवतेच्या दृष्टिकोनातून हे कृत्य योग्य नाही. जे लोक येथे गेली ७०, २५ किंवा ५ वर्षं राहत आहेत, त्यांची मुलं इथे वाढली, शिक्षण घेतलं, त्यांनी भारताला स्वीकारलं आहे. त्यांनी कधीही भारताला हानी पोहोचवलेली नाही. त्यामुळे त्यांना बाहेर काढणे अमानुषपणाचे आहे.”
"जातीनिहाय जनगणना – काहीच चुकीचे नाही"
जातीनिहाय जनगणनेसंदर्भात केंद्र सरकारच्या घोषणेबाबत विचारले असता, त्यांनी उत्तर दिलं, “ही मागणी लोक अनेक वर्षांपासून करत होते. कोणी म्हणतो मुस्लिम ११ कोटी आहेत, कोणी १४ तर कोणी २२ कोटी. त्यामुळे एकदाचा स्पष्ट आकडा मिळेल – ब्राह्मण किती, इतर जाती किती, मुस्लिम, सिख, ख्रिश्चन किंवा इतर धर्मीय किती – हे सगळं समोर येईल. यात काहीच चुकत नाही.”
"गोडसे भारतातलाच होता, त्यामुळे अशा प्रवृत्तींना घाबरू नये"
देशभरात जम्मू-काश्मीरच्या रहिवाशांना त्रास दिला जात असल्याच्या बातम्यांवर फारूक अब्दुल्ला म्हणाले, “असे काही लोक आहेत, ज्यांना दुसऱ्यांना त्रास देण्यात आनंद वाटतो. गांधीजींचा खून करणारा (नाथूराम) गोडसेसुद्धा भारतातलाच होता. अशा प्रवृत्त्या होत्याच आणि पुढेही असतील. पण अशांपासून घाबरायचं कारण नाही. परराज्यातील काश्मिरींना त्रास देऊ नका. केवळ जम्मू-काश्मीरच नव्हे तर इतर राज्यांची सरकारही या गोष्टी होऊन नयेत यासाठी प्रयत्नशील आहेत.”