गाझामधील अन्नपाण्याची मदत रोखणे क्रूरपणा - संयुक्त राष्ट्रे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 12 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जवळपास दोन वर्षांपासून गाझामध्ये इस्राईलची बॉम्बहल्ले सुरू आहेत. यामुळे तिथे अनेक मानवी संकटे निर्माण झाली आहेत. तरीही इस्राईलने गाझाला जाणारी सर्व मदत रोखली आहे. रस्तेही बंद केले आहेत. याच पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या आपत्कालीन मदत समन्वयकाने इस्राईलला आवाहन केले आहे. तसेच गाझा पट्टीत मानवतावादी मदत पोहोचू द्यावी, अशी विनंती देखील त्यांनी केली.

संयुक्त राष्ट्रांचा इस्राईलला सल्ला
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आणि आपत्कालीन मदत समन्वयक टॉम फ्लेचर यांनी गुरुवारी सांगितले की, "गाझामध्ये मदत रोखणे आणि रस्ते बंद करणे म्हणजे क्रूरपणाची शिक्षा आहे." यावर्षी मार्च महिन्यात इस्राईलने युद्धविराम करार मोडला. गाझावर पुन्हा हल्ले सुरू केले आहेत. तसेच सर्व मानवतावादी मदत रोखली आहे.

नागरिकांचे जीवन सौद्याचा विषय नसावा - संयुक्त राष्ट्र
टॉम फ्लेचर यांनी एका निवेदनात सांगितले की, "मानवतावादी मदत आणि नागरिकांचे जीवन यांना कधीही सौद्याचा विषय बनवता कामा नये. मदत रोखल्याने नागरिक उपाशी मरतात."

इस्राईलने सांगितले की, नाकेबंदी आणि नवे लष्करी अभियान यामागचा उद्देश हमासवर दबाव टाकणे आहे. आपल्या ओलिसांना सोडवणे हा हेतू आहे. यापूर्वी झालेल्या करारात हमासने ५९ इस्राईली ओलिसांना टप्प्याटप्प्याने सोडले होते. यात काही परदेशी नागरिकांचाही समावेश होता. इस्राईलनेही शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांना सोडले होते. तरीही सध्या हमासच्या ताब्यात सुमारे २४ इस्राईली ओलिस जिवंत असावेत, असा अंदाज आहे.