देशप्रेम शब्दांत, सूरांत आणि कृतीतून व्यक्त करण्याची वेळ जवळ आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आवाज-द व्हॉइस पुन्हा एकदा तुम्हाला देशप्रेम व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ देत आहे. यंदा तुम्ही आमच्या ‘हिंदुस्तान मेरी जान’ रील मोहिमेत सहभागी होऊ शकता.
ही मोहीम भारतीयांच्या देशभक्तीचा उत्साह जागवण्यासाठी आहे. आम्ही विचारतोय - "माझे भारतावर प्रेम आहे, कारण..."
तुमची क्रियेटीव्हिटी वापरून हे वाक्य पूर्ण करा. मग ती कविता असो की उत्साहपूर्ण रॅप, हृदयस्पर्शी शायरी, गाणे, नृत्य किंवा तुमच्या मनातून येणारी कोणतीही कलाकृती.
तुमची रील केवळ तुमच्या देशप्रेमाची अभिव्यक्ती नसेल, तर ती जगभरातील कोट्यावधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारी भावना असेल.
यापूर्वी आवाज-द व्हॉइसने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. तरुण, शालेय विद्यार्थी आणि कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि रंगांमधून देशप्रेम व्यक्त केले. या चित्रकला स्पर्धेच्या यशातून प्रेरणा घेऊन यावर्षी अहि घेऊन आलो आहोत ही रील मोहीम…
सहभागाचे नियम आणि प्रक्रिया
-
रीलचा वेळ: कमाल १ मिनिट ३० सेकंद
-
रील ओरिजिनल आणि मौलिक असावे. यापूर्वी कोणत्याही सामाजिक माध्यमांवर ती शेअर केलेली नसावी.
-
आक्षेपार्ह, असंवेदनशील किंवा वादग्रस्त मजकूर स्वीकारला जाणार नाही.
-
तुमचे पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी रीलसोबत मेसेजमध्ये नमूद करा.
-
रील पाठवण्याची तारीख: २२ जुलै २०२५ ते १२ ऑगस्ट २०२५
-
रील पाठवा: WhatsApp क्रमांक 9599297502 वर
-
तुमची रील आवाज-द व्हॉइसच्या यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरसारख्या सर्व सोशल मिडीयावर शेयर केली जाईल.
ही मोहीम तुमच्या कलेला मान्यता देईल आणि तुमच्या हृदयातील देशप्रेमाची खरी भावना जगासमोर मांडेल.
टीप:
आवाज-द व्हॉइसला तुमच्या रीलचे प्रसारण आणि वापर करण्याचे पूर्ण हक्क असतील.
मग वाट कशाची पाहताय? कॅमेरा हातात घ्या, देशभक्तीचा उत्साह जागवा आणि तयार करा प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला स्पर्श करणारे दमदार रील.