मी मोदींना काही म्हणालो असेल तर तो व्हिडिओ दाखवा, खासदार दानिश अलींचे आव्हान

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 1 Years ago
खासदार रमेश बिधुरी आणि खासदार दानिश अली
खासदार रमेश बिधुरी आणि खासदार दानिश अली

 

काही दिवसांपुर्वी भारताच्या संसदेत एक लाजीरवाणी गोष्ट घडली. भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दानिश यांनी रविवारी आरोप केला की लोकसभेत 'मौखिक लिंचिंग' नंतर आता सभागृहाबाहेर 'लिंचिंग'साठी एक पार्श्वभूमी तयार केली जात आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या पत्राला उत्तर देताना बसपा नेत्याची ही टिप्पणी आली आहे. अली यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप दुबे यांनी केला होता त्यामुळे पक्षाचे खासदार रमेश बिधुरी संतापले.
 
गेल्या गुरुवारी लोकसभेत चांद्रयान-३ वरील चर्चेदरम्यान बिधुरी यांनी बसपा सदस्य दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली होती. यानंतर गदारोळ सुरू झाला आणि विरोधी पक्षनेत्यांनी भाजप खासदारावर कठोर कारवाईची मागणी केली.

भाजपचे ज्येष्ठ नेते निशिकांत दुबे यांनी शनिवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्या असभ्य वर्तनाची आणि टिप्पणीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
 
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात दुबे यांनी अली यांच्यावर बिधुरी यांच्या लोकसभेतील भाषणात व्यत्यय आणल्याचा आणि अप्रिय टिप्पणी केल्याचा आरोप केला आहे. हे करण्यामागे त्याचा (बिधुरी) संयम सुटावा म्हणून चिथावणी देण्याचा उद्देश होता, असेही दुबे म्हणाले.

मी काही बोललो असेल तर व्हिडिओ दाखवा : दानिश

निशिकांत दुबे यांच्या आरोपांवर दानिश अली म्हणाले, 'मी निशिकांत दुबे यांचे पत्र पाहिले आहे. मला सभागृहात 'शाब्दिक लिंचिंग' करण्यात आले, आता सभागृहाबाहेर मला 'लिंचिंग' करण्याची कथा तयार केली जात आहे. या बिनबुडाच्या आरोपाची चौकशी व्हावी अशी मी लोकसभा अध्यक्षांना विनंती करतो,' असे ते म्हणाले.
 
दानिश अली म्हणाले की, निशिकांत जे काही बोलताय त्याचा व्हिडीओ बघायला हवा. तो व्हिडीओ सादर करा आणि सर्वांना दाखवा. अशा स्थितीत या निराधार आरोपामुळे दुबे यांच्यावर विशेषाधिकार भंगाचा गुन्हा दाखल होतो. त्याचवेळी अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातही अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप दुबे यांनी केला होता.