मिग-२१ लढाऊ विमाने निवृत्त: भारतीय हवाई दलातील सहा दशकांचा इतिहास संपुष्टात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 11 h ago
MiG-21 fighter jet
MiG-21 fighter jet

 

भारतीय हवाई दलात मागील सहा दशकांपासून कार्यरत असणारी मिग-२१ ही लढाऊ विमाने आता निवृत्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील साठ वर्षांच्या काळात झालेल्या लष्करी संघर्षांत मिग-२१ विमानांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

रशियन बनावटीची मिग-२१ ही विमाने १९६३मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झाली होती. सध्या मिग-२१ बायसनच्या दोन स्क्वाडून हवाई दलाच्या ताफ्यात असून सप्टेंबर महिन्यात चंडीगड येथील हवाई दलाच्या तळावर आयोजित एका औपचारिक कार्यक्रमात या विमानांच्या सेवामुक्तीची घोषणा करण्यात येणार आहे. मिग-२१ विमानांना २०२२मध्ये सेवामुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

त्यानुसार श्रीनगर येथे असलेली स्क्वाडून २०२२ मध्ये सेवामुक्त करण्यात आली

मिग-२१ ही लढाऊ विमानाची वैशिष्टे आणि कामगिरी
  • मिकोयान-गुरेविच या कंपनीकडून निर्मिती
 
  • १९६३मध्ये भारतीय हवाई दलात दाखल
 
  • पाकिस्तान विरोधात झालेल्या १९६५ आणि १९७१च्या युद्धात मिग-२१ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे
 
  • शत्रूच्या विमानांना रोखण्याची आणि पाडण्याची क्षमता
 
  • १९७१च्या युद्धात मिग-२१च्या मदतीने देशाच्या नौदलाने पाकिस्तानातील हवाई दलाच्या तळांवर तब्बल ५०० किलोचे बाँब फेकले
 
  • ध्वनीपेक्षा अधिक वेगाने उड्डाण करण्याची क्षमता असणारे सुपरसॉनिक लढाऊ विमान
 
  • सर्वप्रकारच्या हवामानात उड्डाण करण्याची क्षमता
 
  • हुलके त्यामुळे वेगवान उड्डाण करणारे लढाऊ विमान म्हणून ओळख