मोहन भागवतांनी संघाच्या कार्यकर्त्यांना दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या कार्यकर्त्यांना जे हिंदू नाहीत, अशा विचारसरणीच्या लोकांना आपल्या विचारसरणीशी जोडून घ्यावे, असे सांगितले आहे.

अवध प्रांताच्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितले की, मुस्लिम, सिख, जैन आणि इतर समुदायाच्या लोकांना आपल्या विचारसरणीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे.

यामुळे आता भारतीय जनता पक्षाप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील मुसलमानांना आपल्या सोबत सामावून घेण्याचे कार्य करत असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच पसमंडा मुसलमानांशी चर्चा केली होती.

याचबरोबर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा मंच आधीपासूनच मुसलमानांमध्ये काम करत आहे. मात्र आता स्वयंसेवक संघाला या मंचाची व्याप्ती वाढवायची असून संघ या कामाला लागला आहे.

आपली कट्टर हिंदू प्रतिमा आरएसएस तोडण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आरएसएस प्रत्येक पंथात समन्वय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय आरएसएसने दलित समाजातही काम करण्याचे सुरुवात केली आहे. यासाठी संघात वेगवेगळे गट तयार करण्यात आले आहेत.

हिंदूं व्यतिरिक्त इतर समाज कशाप्रकारे आपल्याकडे वळेल यासाठी ब्लू प्रिंट तयार झाली आहे. ब्लू प्रिंट प्रमाणे ख्रिश्चन, मुस्लिम, सिख व इतर धर्माच्या लोकांना संघाचे कार्यकर्ते भेटतील. या सर्व धर्मांच्या प्रार्थना स्थळांवरही बैठक होणार आहे,