मुंबईत २००६ मध्ये लोकल रेल्वेगाड्यांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेतील आरोपींना सबळ पुराव्याअभावी सोडण्याचा निकाल अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या निकालाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. येत्या गुरूवारी या याचिकेवर सुनावणी घेतली जाईल, असे सरन्यायाधीश भूषण गवई, न्यायाधीश के. विनोद चंद्रन आणि न्यायाधीश एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या विशेष टाडा न्यायालयाने बॉम्बस्फोटाच्या घटनेतील सर्व बारा आरोपीची निर्दोष सुटका ली. ११ जुलै २००६ रोजी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर विभिन्न रेल्वे स्थानकात चालत्या गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. यात १८० लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो लोक जखमी झाले होते.
आरोपींची गुन्हा केला, यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याची टिपणी करत टाडा न्यायालयाने आरोपीची मुक्तता केली होती. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. त्यापाठोपाठ याचिका दाखल करण्यात आली आहे. बॉम्बस्फोटातील आरोपींना सोडले जाण्याचे प्रकरण महत्त्वाचे असल्याने याचिकेवर लवकर सुनावणी घेतली जावी, अशी विनंती राज्य सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केली.
यावर गुरूवारी सुनावणी घेतली जाईल, असे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणात आरोपींविरोधात सबळ पुरावे आहेत आणि उच्ब न्यायालयाच्या निर्णयामुळे पीडितांना न्याय मिळालेला नाही, असा मुद्दाही मेहता यांनी मांडला.