निवडणूक घोषणापत्र म्हणजे प्राण जाये पर वचन न जाये : पंतप्रधान मोदी

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 13 d ago
पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांवर भाष्य केलं. लोकशाही येणाऱ्या पिढीच्या हृद्यात आहे. काँग्रेसचे पाच-सहा दशकाचं काम आहे. माझा कार्यकाळ फक्त दहा वर्षांचा राहिला आहे. पण, प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगळेपण दिसून येत आहे. देशवासियांनी संधी दिल्यामुळे आपण फक्त देश हे एकवेळ ध्येय ठेवले पाहिजे, असं मोदी म्हणाले.

देशातील कोणालाही घाबरण्याचं काम नाही. माझे निर्णय हे देशाच्या कल्याणासाठी आहेत. मी वेळ घालवणार नाही. जास्तीत जास्त करण्याचा मी प्रयत्न केला आहे. पण, मला आणखी खूप काही करायचं आहे. प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. म्हणून मी म्हणतो की हा केवळ एक ट्रेलर आहे. अजून मला खूप काही करायचं आहे, असं ते म्हणाले. 

वारंवार निवडणुका, आचारसंहिता, कोणत्याही राज्यात निवडणुका असल्यास अनेक अधिकारी दुसऱ्या राज्यात पाठवले जायचे. त्यामुळे मुख्यमंत्री असताना मला याची अडचण जाणवली. त्यामुळे एकत्र निवडणूक घेण्याचा आमचा प्लॅन आहे, असं मोदी म्हणाले. प्राण जाये पर वचन ना जाये अशी आमची परंपरा आहे. दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत. त्यामुळेच मोदी कि गॅरंटी अशी आमची घोषणा आहे, असं ते म्हणाले.

राम मंदिराचा मुद्दा आधीच्या पक्षांना सोडवता आला नाही. आम्ही तो प्रश्न सोडवला. राम मंदिर बनल्याने काही धोका निर्माण झाला नाही. त्यांनी याबाबत लोकांच्या मनात भीती निर्माण केली होती. राम मंदिर हा त्यांच्यासाठी राजकारणाचा मुद्दा आहे. राम मंदिर झाले, त्यामुळे त्यांचा मुद्दा संपला. याच रोषातून ते टीका करत असतात, असं मोदी म्हणाले.

राम मंदिराच्या काळात ११ दिवसांचे अनुष्ठान केलं. जमिनीवर झोपत होतो, नारळाच्या पाण्यावर जगत होता. दक्षिणेत जाऊन कंब रामायणाचा मी पाठ केला. पंतप्रधान म्हणून नाही, तर एक रामभक्त म्हणून राम मंदिर सोहळ्याला सामोरे गेलो. मला पाचशे वर्षांचा संघर्ष दिसत होता, असं ते म्हणाले.