गुलामीच्या मानसिकतेत बुडून जाता कामा नये; पंतप्रधान मोदींचे सूचक वक्तव्य

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

परदेशी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले आहेत. पालम विमानतळावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते मोदींच्या स्वागतासाठी पोहचले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सत्ताधारी आणि विरोधक, या दोघांनीही भारताचा सत्कार केला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

 

तर, देशातील संसदेच्या नव्या इमरातीच्या उद्घाटनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यावर पंतप्रधान मोदींनी सूचक वक्तव्य केलं. देशाबाबत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले कि, गुलामीच्या मानसिकतेत बुडून जाता कामा नये. मी जगातील देशांमध्ये जातो तेथे जगातील अनेक मोठ्या व्यक्तींना भेटतो. त्यावेळी मी नव्या भारताच्या क्षमतेबद्दल बोलतो. माझ्या देशाच्या महान संस्कृतीचा गौरव करताना त्याबद्दल बोलताना मी ताठ मानेने बोलतो. हे सगळं करण्याचे सामार्थ्य माझ्यामध्ये आहे. कारण तुम्ही बहुमताचे सरकार बनवले आहे. जेव्हा मी जगभरात जातो त्यावेळी मी १४० कोटी भारतीय नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो, अंसही ते म्हणाले.


मोदी तीन देशांच्या दौऱ्यानंतर भारतात परतले आहेत. सकाळी ५.१० च्या सुमारास त्यांचे विमान दिल्लीतील पालम विमानतळावर उतरले. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजपचे शेकडो कार्यकर्ते विमानतळाबाहेर रात्रभर उभे होते. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजपच्या दिल्ली राज्य युनिटने विमानतळाबाहेर जल्लोष केला.

भाजपचे अनेक कार्यकर्ते हातात तिरंगा आणि ‘जगाचा आवडता नेता’ असे पोस्टर घेऊन उभे होते. मोदी तीन देशांच्या अधिकृत दौऱ्यानंतर भारतात परतले आहेत. पंतप्रधान मोदी जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले होते. गेल्या सहा दिवसांत पंतप्रधानांनी या तिन्ही देशांमध्ये अनेक बैठका घेतल्या.