अमेरिकेत दहशतवादाविरुद्ध भारताचा एल्गार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
भारताचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ अमेरिकेत दाखल
भारताचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ अमेरिकेत दाखल

 

"पाकिस्तानात वास्तव्य करीत असणारी कोणतीही व्यक्ती सीमा ओलांडून भारतात येईल आणि येथील निरपराध नागरिकांचा बळी घेईल, असे ऑपरेशन सिंदूरनंतर होणार नाही. असे काही घडल्यास त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारत एकजुटीने उभा आहे," असा ठाम निर्धार काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी अमेरिकेत व्यक्त केला. थरूर भारतीय सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. हे शिष्टमंडळ गयाना, पनामा, कोलंबिया, ब्राझील आणि अमेरिका या देशांच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताचा दहशतवादाविरोधातील निर्धार व्यक्त केला जात असून, पाकिस्तानच्या दहशतवादाशी असलेल्या संबंधांवरही भर दिला जात आहे.

अमेरिकेत धरूर बोलत होते. या वेळी त्यांच्या शिष्टमंडळातील अन्य सदस्य झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्फराज अहमद, भाजपचे तेजस्वी सूर्या, भुवनेश्वर कलिता, टीडीपीचे गंती हरीश माधूर, शिवसेनेचे मिलिंद देवरा उपस्थित होते. 'ऑपरेशन सिंद' अंतर्गत भारताने कोणती कारवाई केली याबाबत सविस्तर माहिती शिष्टमंडळाकडून देण्यात येत आहे. 

शनिवारी न्यूयॉर्क येथील भारताच्या वाणिज्य दूतावासाने आयोजित केलेल्या एका संवादात भारतीय-अमेरिकन समुदायातील काही प्रमुख सदस्य; तसेच आघाडीच्या माध्यम संस्था आणि 'थिंक टैंक'चे प्रतिनिधी सहभागी झाले होते. थरूर या वेळी म्हणाले, "पाकिस्तानबाबत भारताचा संदेश स्पष्ट आहे. आम्हाला कोणतीही गोष्ट सुरू करायची नव्हती. दहशतवाद्यांनी या सगळ्याची सुरुवात केली आणि आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिले. जर ते खांबले, तर भारतही थांबेल. 

मात्र, यानंतरही दहशतवाद्यांचे उद्योग थांबले नाहीत, तर ऑपरेशन सिंदूरही सुरूच राहील. ती ८८ तासांची लवाई होती. हा संघर्ष टाळता आला असता. पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांना प्राण गमवावे लागले. त्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात तीव्र लढा देण्याचा निर्धार केला. पाकिस्तानात बसून कोणीही हे समजून घेऊ नये की ते सहजपणे सीमारेषा ओलांडून आमच्या नागरिकांना मारू शकतात आणि त्यांना काहीही शिक्षा होणार नाही. आता त्याची किंमत मोजावी लागेल. कोणत्याही कठीण स्थितीशी सामना करण्याचे आम्ही ठरवले आहे. गेल्या काही वर्षांपासून आपला मुख्य भर जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मुक्त बाजार अर्थव्यवस्थेला अधिक प्रगल्भलोकशाही राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करण्यावर आहे. भारताचे लक्ष आर्थिक विकास, तंत्रज्ञान, सर्वांगीण प्रगतीवर आहे. सध्याच्या काळात गरिबीतून नागरिकांना बाहेर करून संभाच्या जगात सहभागी करून मेण्यावर भारताचा भर आहे." 

सर्वपक्षीय शिष्टमंडळ शनिवारी न्यूयॉर्कमध्ये पोहोचले असून, ते येथून पुढे गयानाकडे रवाना होणार आहे. शिष्टमंडळ ३ जूनला पुन्य अमेरिकेत परतणार आहे. या सर्व देशांमध्ये सरकारचे प्रतिनिधी, उद्योजक आणि प्रतिष्ठित व्यक्ती आदींची हे शिष्टमंडळ भेट घेईल.

कॉँग्रेसचे खासदार शशी थरूर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "मी भारत सरकारसाठी काम करत नाही. मी विरोधी पक्षामध्ये आहे. मात्र दहशतवादाविरोधात भारत एकजुटीने उभा असून, सरकारची हीच भूमिका स्पष्ट करण्यासाठी येथे आलो आहे. धर्म आणि इतर भेदभाव निमाण करण्याचे प्रयत्न झाले असतानाही दहशतवादाविरोधात उदताना देशात एकोप्याची भावना होती."

'भारताला युद्धात रस नाही' 
शशी थरूर यांनी ठामपणे सांगितले की, "भारताला युद्धात अजिबात रस नाही. आम्हाला पाकिस्तानबरोबर युद्ध करायचं नाही. आम्हाला आमचा आर्थिक विकास शांततेत साध्य करायचा आहे आणि आमच्या नागरिकांना २९ व्या शतकाच्या संधींमध्ये सहभागी करून घ्यावचं आहे. आम्ही जरी स्थैर्वप्रिय राष्ट्र असलो, तरी ते नाहीत. पाकिस्तान एक वर्चस्वाकांक्षी राष्ट्र आहे. भारताच्या नियंत्रणाखालील भूभागावर त्यांची नजर आहे आणि तो मिळवण्यासाठी ते कोणतीही गोष्ट करण्यास तयार आहेत.