पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; १० दिवसांत तिसऱ्यांदा फटका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 14 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर ९१ पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसांपेक्षा कमी कालावधीत इंधनाच्या दरात झालेली ही तिसरी वाढ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या बदलांचा परिणाम म्हणून सरकारी तेल कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

 

या दरवाढीमुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ८७ पैशांनी वाढून ९८.६४ रुपयांवरून ९९.५१ रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर डिझेलच्या दरात ९१ पैशांची वाढ झाली असून ते ९१.५८ रुपयांवरून ९२.४९ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे.

 

 

१० दिवसांत तिसऱ्यांदा दरवाढ

पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर ऊर्जेच्या किमती सातत्याने वाढत आहेत. या वाढलेल्या किमतींचा बोजा सरकारी तेल कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केली आहे. १५ मे पासून इंधन दरात वाढ होण्यास सुरुवात झाली असून १० दिवसांतील ही तिसरी वाढ ठरली आहे.


यापूर्वी १५ मे रोजी इंधनाच्या दरात थेट ३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर १९ मे रोजी पुन्हा ९० पैशांची वाढ झाली. या सर्व वाढी मिळून गेल्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एकूण सुमारे ५ रुपये प्रतिलिटरची वाढ झाली आहे. पश्चिम आशियातील तणाव असाच राहिल्यास आगामी काळात इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.