'ऑपरेशन मिडनाईट हॅमर'मध्ये भारतीय हवाई क्षेत्राचा वापर नाही: पीआयबी फॅक्ट चेक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

'ऑपरेशन मिडनाईट हॅमर' दरम्यान अमेरिकेने इराणविरुद्धच्या हल्ल्यांसाठी भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला नाही, असे पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर याबाबत फिरणारे दावे चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय आहे व्हायरल दावा?
अनेक सोशल मीडिया अकाउंट्सवर असा दावा करण्यात आला होता, की 'ऑपरेशन मिडनाईट हॅमर' या कारवाईदरम्यान अमेरिकेने इराणवर विमाने पाठवण्यासाठी भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला.

पीआयबी फॅक्ट चेकने केला खुलासा
पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या अधिकृत 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून या दाव्याचे खंडन केले. जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी वापरलेल्या विमान मार्गाची स्पष्ट माहिती दिली आहे. त्यात भारताचा समावेश नव्हता, असे पीआयबीने नमूद केले.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी पत्रकार परिषदेत अमेरिकेच्या विमानांनी वापरलेला मार्ग स्पष्ट केला होता. त्यांच्या स्पष्टीकरणानुसार, या कारवाईत भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करण्यात आला नव्हता.

गैरसमज टाळण्याचे आवाहन
पीआयबी फॅक्ट चेकने लोकांना अशा खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत स्रोतांकडून माहिती तपासण्याचे आवाहन केले आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter