PM Modi on Pandit Nehru : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ६२ व्या स्मृतिदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (X) पोस्ट करत त्यांनी पंडित नेहरूंना स्मरण केले आहे.

पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली."

पंडित नेहरूंचा राजकीय प्रवास

पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ पासून ते २७ मे १९६४ पर्यंत देशाचे पंतप्रधान म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर आधुनिक भारताच्या उभारणीत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

पंडित नेहरू यांचे २७ मे १९६४ रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.