राम फक्त हिंदूंचेच नव्हे ते मुस्लिम आणि ख्रिस्ती यांचेही

Story by  Awaz Marathi | Published by  vivek panmand • 1 Years ago
फारुख अब्दुल्ला यांचे वक्तव्य
फारुख अब्दुल्ला यांचे वक्तव्य

 

 जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि एनसीचे प्रमुख डॉ. फारुख अब्दुल्ला  यांनी मोठं वक्तव्य केलंय. भगवान राम (Lord Ram) हे फक्त हिंदूंचेच देव नाहीत, तर ते मुस्लिम, ख्रिश्चन आणि सर्वांचेच देव आहेत, असं त्यांनी म्हटलंय.

 
भाजपवर निशाणा साधत अब्दुल्ला म्हणाले, भाजप  केवळ सत्तेत राहण्यासाठी रामाच्या नावाचा वापर करत आहे. मात्र, राम हा फक्त हिंदूंचा देव नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. जम्मूमध्ये एका रॅलीला संबोधित करताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, "भगवान राम हे फक्त हिंदूंचे देव नाहीत. तुमच्या मनातून ही कल्पना काढून टाका. भगवान राम हे सर्वांचे देव आहेत. मग तो मुस्लिम (Muslim) असो, ख्रिश्चन असो किंवा अमेरिकन असो. सगळ्यांचा प्रभू रामावर विश्वास आहे."
 
केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीपूर्वी धार्मिक ध्रुवीकरणाविरुद्ध त्यांनी लोकांना सावध केलं. ते म्हणाले, "ते (भाजप) निवडणुकीदरम्यान हिंदू धोक्यात आहे असा प्रचार करतील. पण, तुम्ही त्याला बळी पडू नका, अशी विनंतीही त्यांनी यावेळी जनतेला केली.