गणिताची भीती दूर करणारा अवलिया: अनिस कुट्टी

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
अनिस कुट्टी
अनिस कुट्टी

 

डोक्यावर टोपी आणि आणि चेहऱ्यावर दाढी असलेला एक 'भैय्या'. विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने गणित शिकवतात की गणित हा त्यांचा आवडता विषय बनतो. खरं तर, गणिताचा गुणाकार मुलांसाठी अनेकदा समस्या बनतो. त्यामुळे ते गणितापासून दूर पळतात,  पण हा वयोवृद्ध भैय्या, ‘अनीस कुट्टी’ गणित हा विषय विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय बनवून ठेवतो.    

अनीस कुट्टी हे पुण्यातील सुप्रसिद्ध गणिताचे शिक्षक आहेत, जे मुलांना त्यांच्या समस्या सोडवण्यास मदत करण्यासोबतच त्यांना शिक्षणातून पुढे जाण्याचा मार्गही दाखवतात. ते  केवळ मुलांनाच मार्गदर्शन करत नाहीत, तर त्यांच्या पालकांना नवोदय विद्यालय, सैनिक शाळा, आणि आरएमसी स्कूल इ. अशा विविध संस्था आणि शाळांबद्दल माहिती देतात.
 
गणितज्ञ अनीस कुट्टी पालकांना सांगतात की या संस्थांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते. ते म्हणतात की या शाळांमध्ये प्रवेश घेतल्याने मूल उच्च पदावर विराजमान होणार हे निश्चित होते. समस्या अशी आहे की सामान्य लोकांना या संस्थांची पूर्ण माहिती नाही.

गणितज्ञ अनीस कुट्टी
अनीस कुट्टी हे केरळचे आहेत, पण बऱ्याच वर्षांपासून पुण्यात राहतात. गणिताच्या शिकवणी बद्दल सांगताना ते म्हणाले कि, “मी दहावीत असताना शिक्षक दिनी मी माझ्या सहकाऱ्यांना पहिल्यांदा गणित शिकवले”. आणि तेव्हापासून लोक त्याच्याकडे गणिताचे प्रश्न घेऊन येऊ लागले.
 
१९९८ पासून ते गणित शिकवत आहेत. शाळांमध्ये गणित शिकविण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची तर्कशक्ती विकसित करणे हा असला पाहिजे; केवळ गोष्टी तोंडपाठ असणे बरोबर नाही, असे त्यांचे मत आहे,  गणितज्ञ अनीस कुट्टी त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एकाच वेळी गुरू, वाटाड्या आणि करिअर समुपदेशकाची भूमिका बजावतात.

हम होंगे कामयाब
अनीस कुट्टी म्हणतात, " आजच्या पिढीने मोठे होऊन भारताचे जबाबदार नागरिक व्हावे अशी माझी इच्छा आहे." यासाठी ते आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार एनडीएमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. वर्गात केवळ परीक्षेसाठीच नाही तर इतर संपूर्ण बाबींची तयारी करण्यासाठी सर्व प्रकारे मदत करतात.
 
लक्षात ठेवा की राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) ही भारतीय सशस्त्र दलांची संयुक्त सेवा अकादमी आहे. जिथे लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सेवांमधील कॅडेट्स प्री-कमिशनिंग प्रशिक्षणासाठी त्यांच्या संबंधित सेवा अकादमींमध्ये जाण्यापूर्वी एकत्रितपणे प्रशिक्षण घेतात.

खेळात गणित
गणित काहींसाठी सोपे तर काहींसाठी अवघड असते. बहुतांश विद्यार्थ्यांसाठी गणित हा सर्वात कठीण विषय असतो. परंतु चांगला शिक्षक मिळाला तर गणिताचे प्रश्न क्षणार्धात सोडवता येतात.
 
अनीस कुट्टी सांगतात की, गणित हा समजून घेण्याचा आणि सरावाचा विषय आहे. गेल्या ३५ वर्षांपासून ते मुलांना गणित शिकवत आहेत. मुलांना गणिताची आवड निर्माण व्हावी म्हणून ते गणित शिकवण्याचे नवनवीन मार्ग शोधत राहतात. जसे अमर-अकबर-अँथनी,  चंगु-मंगू,  मारा-मारी,  जुगलबंदी,  चांडाळ-चौकडी इ.
 
मुलांना त्याची सट्टा पद्धत आवडते, म्हणजे 'समस्येचा शॉर्टकट'. त्यांचे विद्यार्थी अनीस कुट्टी यांना सर म्हणत नाहीत तर भैया म्हणतात. आणि तेही त्यांना नेहमी मोठ्या भावाप्रमाणे मार्गदर्शन करतो.
 
अनीस कुट्टीच्या प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि गणित समजावून सांगण्याच्या पद्धतींमुळे मोठ्या संख्येने मुलांना एन डी ए  मध्ये प्रवेश मिळण्यास मदत झाली आहे. याशिवाय इतर ठिकाणी त्यांचे विद्यार्थी सेवा देत आहेत.

गणित सर्वत्र आहे
ते म्हणतात, “आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात गणिताचे महत्त्व वाढले आहे. मुलांनी गणिताच्या फोबियातून बाहेर पडून आपले १०० टक्के दिले पाहिजे. अनीस कुट्टीच्या मदतीने आर्यन मोरे असो की गौरव जगताप किंवा अदिती कुमार त्यांच्यासारखे अनेक तरुण एनडीएमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले. आज ते देशसेवेत कार्यरत आहेत. यांच्या सारखे ६५० हून अधिक विद्यार्थी एन डी ए मध्ये निवड झाले.