लुई ब्रेल : स्वत: अंध असतानाही जगभरातल्या अंधांसाठी ‘डोळस’ कामगिरी करणारा अवलिया

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
लुई ब्रेल
लुई ब्रेल

 

शिक्षणाचा अधिकार सगळ्यांनाच आहे. पण जर डोळेच नसतील तर लेखन, वाचन कसं करणार? असा प्रश्न आता कोणाला पडत नाही. कारण अंध लोकांना वाचता यावं यासाठी ब्रेल लिपी आहे. पण तुम्हाला या लिपी मागची कहाणी माहिती आहे का? जाणून घ्या.

महान फ्रेंच शिक्षणतज्ज्ञ लुईस ब्रेल यांचा जन्म ४ जानेवारी, १८०९ ला झाला होता. त्यांनी एक विशिष्ट लिपी शोधली, जी पुढे अंध व्यक्तींसाठी शिक्षणाचा स्रोत बनली. त्यांच्या नावावर हे या लिपीला ‘ब्रेल लिपी’ असे नाव देण्यात आले. त्यांच्या स्मृतींन उजाळा देण्यासाठी ४ जानेवारी हा दिवस ‘जागतिक ब्रेल दिन’ म्हणून साजरा केला जातो.

वयाच्या तिसऱ्या वर्षी डोळे गमावले
लुई ब्रेल हे मूळचे फ्रान्स देशाचे नागरिक होते. लुई ब्रेल यांनी ब्रेल लीपी विकसित करुन अंध लोकांना साक्षर करण्याचं मोठं काम केलं. आपल्या जीवनाचा मोठा वेळ त्यांनी ब्रेल लीपी विकसित करण्यासाठी दिला. त्यांच्या या कामामुळेच आज लाखो अंध लोक डोळस बनले आहेत. लुई ब्रेल यांचा जन्म ४ जानेवारी १८०९ मध्ये फ्रान्स देशात झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षीच त्यांच्यासोबत एक दुर्घटना घडली. याच अपघातात त्यांची दृष्टी गेली.

मात्र डोळ्याने ते अंध असले तरी त्यांची बुद्धी तल्लख होती. परीक्षेमध्ये ते कायमच चांगली कामगिरी करायचे. त्यांनी अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्लाईंड यूथ येथे पुढील शिक्षण घेतले. येथे शिक्षण घेत असतानाच त्यांनी अंध मुलांना वाचण्यासाठी एक स्पेसल कोड विकसित केला होता. याच कोडला नंतर ब्रेल लीपी म्हणून ओळखले जाऊ लागले.

लुई ब्रेल यांची भेट आपल्या शालेय जीवनात कॅप्टन चार्ल्स बार्बियर यांच्याशी झाली. त्यांनी सैनिकांना रात्रीच्या अंधारात संदेश वाचण्यासाठी क्रिप्टोग्राफीचा विकास केला होता. याच क्रिप्टोग्राफी लिपीच्या मदतीने रात्रीच्या अंधारात सैनिकांना संदेशाचे वाचन करता येत असे.

कॅप्टन चार्ल्स यांच्याकडून प्रेरणा घेऊन नंतर ब्रेल यांनी नव्या भाषेचा शोध लावला. यावेळी त्यांचे वय अवघे १६ वर्षे होते. लुई ब्रेल यांनी सहा बिंदुंचा वापर करत ६४ अक्षरं आणि चिन्हांचा शोध लावला. यामध्ये त्यांनी विराम चिन्हा, अक्षर, संख्या तसेच संगिताचे नोटेशन्स लिहण्यासाठी देखील महत्त्वाचे चिन्ह दिले. ब्रेल यांच्या याच लिपीला नंतर ब्रेल लिपी म्हणून ओळखले जाऊ लागले.