लव्ह जिहाद प्रकरणांची चुकीची माहिती दिल्याप्रकरणी मंत्र लोढा यांचा राजीनामा घ्यावा- अबू आझमी

Story by  Awaz Marathi | Published by  vivek panmand • 1 Years ago
अबू आझमी यांनी केली विधानसभेत मागणी
अबू आझमी यांनी केली विधानसभेत मागणी

 

 लव्ह जिहादवरून राज्यातील वातावरण तापलेले असताना लव्ह जिहादची चुकीची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सोमवारी केला. याबद्दल लोढा यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. लोढा यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करून घेतला जात नसल्याची तक्रारही आझमी यांनी केली. 

 

राज्य सरकारने स्थापन केलेल्या आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीकडे गेल्या सहा महिन्यात किती तक्रारी आल्या आहेत, अशी विचारणा पक्षाचे आमदार रईस शेख यांनी महिला व बालविकास आयुक्त यांच्याकडे केली होती. त्याला आयुक्त आर. विमला यांनी पाठविलेल्या उत्तरात समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारींची संख्या शून्य असल्याचे म्हटले आहे. 

 

आझमी यांनी सभागृहात केलेल्या विधानावरून भाजप आमदारांनी सभागृहात गदारोळ घातला. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या मुद्याला आक्षेप घेत अबू आझमी यांचे विधान पटलावरून काढून टाकण्याची मागणी केली. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आझमी यांनी दिलेली माहिती पटलावरून काढून टाकली.