मुंबई पोलिसांच्या आवाहनाला मुस्लिम बांधवांचा सकारात्मक प्रतिसाद

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 1 Years ago
मुंबई पोलिस उपायुक्त कार्यक्रमात मुस्लिम बांधवांचा सत्कार करताना
मुंबई पोलिस उपायुक्त कार्यक्रमात मुस्लिम बांधवांचा सत्कार करताना

 

यंदा गणपती विसर्जन आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी येत असल्याने पोलिस प्रशासनावर मोठा ताण पडणार आहे. कुठेही काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांना दक्ष राहावे लागणार आहे.  उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून मुंबई पोलिस प्रशासनाने मुस्लिम बांधवांना या संदर्भात आवाहन केले. या आवाहनाला मुस्लिम समाजानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुस्लीम समाजाच्या या सकारात्मक प्रतिसादाने पोलिस प्रशासनावरचा  ताण व दबाव कमी होण्यास मदत होणार आहे.

मुंबईमधील कार्यक्रमात पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद जुलूस एकाच दिवशी असल्याने, काही ठिकाणी मुस्लिम बांधव ईदची जुलूस मिरवणूक दुसऱ्या दिवशी काढणार असल्याचे वाशीतील मुस्लीम बांधवांना सांगितले. त्यामुळे नवी मुंबईतही असा निर्णय घ्यावा असे आवाहन उपायुक्तांनी केले. उपायुक्तांचे भाषण सुरू असतानाच आवाहानाला टाळ्यांच्या कडकडाटात मुस्लीम समाजाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.  

यावेळी मुस्लिम एकता फाऊंडेशनचे आलम बाबा, सुन्नी जमियात उल्मा आणि उम्मीद वेल्फेअर फाउंडेशनचे मिराज शहा यांनी ही विनंती मान्य करत विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ ऐवजी २९ सप्टेंबरला ईद निमित्त मिरवणूक काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 
 
कार्यक्रमात उपस्थित गणेश मंडळातील प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांनी मुस्लीम बांधवांच्या या निर्णयाचे स्वागत केले. माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आणि मनपा उपायुक्त श्रीराम पवार यांनीही मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे स्वागत केले.
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻


‘ईद ए मिलाद’चा जुलूस २९ सप्टेंबरला; वणीत मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

 

अनंत चतुर्दशीनंतर निघणार ईद- ए- मिलादची मिरवणूक; मुस्लिम बांधवांकडून सलोख्याचा संदेश

 

जुन्नरला सामाजिक सलोख्याचे दर्शन; गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पैगंबर जयंतीची मिरवणूकीचा निर्णय

 

किन्हवलीतील मुस्लिम बांधवांचे एक पाऊल पुढे


अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी. मिरवणुकीबाबत मुस्लीम समाजाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र होतेय कौतुक

 

अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्यामुळे सोलापूरच्या मुस्लीम समाजाने घेतला 'हा' निर्णय


अनंत चतुर्दशी अन् ईद एकाच दिवशी, मुस्लिम समुदायाने घेतला 'हा' मोठा निर्णय


नाशिकच्या चांदोरीतील मुस्लीम समाजाने घेतला 'हा' ऐतिहासिक निर्णय  

 


 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट, चर्चा आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

 

WhatsApp | Telegram | Facebook

Twitter | Instagram | YouTube