जुन्नरला सामाजिक सलोख्याचे दर्शन; गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पैगंबर जयंतीच्या मिरवणूकीचा निर्णय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समिती बैठक
ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समिती बैठक

 

जुन्नर - गणपती विसर्जन व ईद ए मिलाद एकाच दिवशी येत असल्याने जुन्नर शहरातील मुस्लिम समाजाने ईद निमित्त काढण्यात येणारी पैगंबर जयंतीची मिरवणूक दुसऱ्या दिवशी करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत हा निर्णय कादरीया वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष रऊफ खान यांनी जाहीर केला.

गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या निमित्ताने जुन्नर येथे शांतता समितीची बैठक सोमवार ता.११ रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस,उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, पोलीस निरीक्षक नारायण पवार ,नगराध्यक्ष शाम पांडे,आशा बुचके, गणेश मंडळाचे कार्यकर्ते, कादरीया वेलफेअर सोसायटीचे सदस्य ईद मिलाद कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

शिवजन्मभूमीतील सामाजिक एकता व सलोखा कायम रहावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आला असून दरवर्षी प्रमाणे गणेश विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना कादरीया वेलफेअर सोसायटी तर्फे सकाळी चहा ,नाश्ता,पाणी देण्यात येणार असल्याचे रऊफ खान यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक फिरोज पठाण, सईद पटेल, मोहमद उमर,अजीम तिरंदाज, मनू पिरजदे, इकबाल बेग, जरार कुरेशी, रऊफ इनामदार ,वाजीद इनामदार,हनीफ शेख, उपस्थित होते.

यापूर्वी समाजाच्या बैठकीत दोन्ही समाजाला आपापल्या सणांचा आनंद घेता यावा तसेच शहरात शांतता व सामाजिक सलोखा रहावा. यासाठी ईद ए मिलादच्या दुसऱ्या दिवशी पैगंबर जयंतीची मिरवणूकीत कुराण पठण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻

 

‘ईद ए मिलाद’चा जुलूस २९ सप्टेंबरला; वणीत मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

 

अनंत चतुर्दशीनंतर निघणार ईद- ए- मिलादची मिरवणूक; मुस्लिम बांधवांकडून सलोख्याचा संदेश

 

किन्हवलीतील मुस्लिम बांधवांचे एक पाऊल पुढे


अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी. मिरवणुकीबाबत मुस्लीम समाजाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र होतेय कौतुक

 

अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्यामुळे सोलापूरच्या मुस्लीम समाजाने घेतला 'हा' निर्णय


अनंत चतुर्दशी अन् ईद एकाच दिवशी, मुस्लिम समुदायाने घेतला 'हा' मोठा निर्णय


नाशिकच्या चांदोरीतील मुस्लीम समाजाने घेतला 'हा' ऐतिहासिक निर्णय  


 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट, चर्चा आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

 

WhatsApp | Telegram | Facebook

Twitter | Instagram | YouTube